Next
बॅंक ऑफ महाराष्ट्रला बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड पुरस्कार
BOI
Monday, October 15 | 01:33 PM
15 0 0
Share this story

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने कार्यकारी संचालक ए. सी. राऊत व महाव्यवस्थापक राजकिरण भोईर यांनी ‘बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड’ पुरस्कार स्विकारला.

पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने मानाचा ‘बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड’ पुरस्कार पटकावला आहे. एम्प्लॉयर ब्रँडिंग इन्स्टिट्यूट, वर्ल्ड एचआरडी कॉंग्रेस व स्टार इंडस्ट्री ग्रुप व स्ट्रॅटेजिक पार्टनर सीआरआरओ एशिया यांच्या वतीने आयोजित तेराव्या पुणे एम्प्लॉयर ब्रँडिंग पुरस्कार सोहळ्यात बँकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

अभिनव व्यवस्थापन पद्धतींद्वारे मनुष्यबळ विकासात बँकेने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याकरता हा पुरस्कार बँकेस देण्यात आला आहे. 

या वेळी ए. सी. राऊत म्हणाले, ‘बॅक ऑफ महाराष्ट्राला ‘बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आमच्या संस्थेच्या वचनबद्धतेचा पुनरूउच्चार आणि आमच्या बँकेच्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. हा पुरस्कार आम्हाला योग्य मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहण्यास प्रोत्साहन देईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link