Next
‘महिंद्रा टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, June 14, 2018 | 01:55 PM
15 0 0
Share this storyनवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट क्षेत्र ऊर्जा कार्यक्षम असावे, यासाठी महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड  (एमएलडीएल) आणि द एनर्जी अॅंड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) यांनी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे संशोधन केंद्र स्थापन केले. या केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच संशोधन केंद्र आहे. भारतात सध्या ऊर्जा-कार्यक्षम इमारतींची संख्या पाच टक्क्यांहूनही कमी आहे. त्यामुळे हरित इमारतींच्या विकासास चालना मिळावी व रिअल इस्टेट क्षेत्राला शास्त्रशुद्ध उपाय मिळावेत म्हणून सीओई संशोधन करणार आहे. अत्याधुनिक संशोधन तंत्रे, साधने व कार्यक्षमता मापन यांचा वापर याकामी होणार आहे.

तयार स्वरूपाचा आणि ऊर्जा-कार्यक्षम साहित्य व तंत्रज्ञानाचा एक सुसंगत असा ‘डाटाबेस’ यामध्ये विकसित करण्यात येणार आहे. देशाच्या गृहनिर्माण धोरणामध्ये हरित स्वरूप, शाश्वत विकास व उर्जा कार्यक्षमता यांना प्राधान्य मिळावे, म्हणून सीओई ही संस्था केंद्र व राज्य सरकारांनाही हे आराखडे पुरवील. त्यायोगे देशातील उपलब्ध ऊर्जेचा सुयोग्य वापर होण्यास पाठबळ मिळेल; तसेच कार्बन डाय ऑक्साइडसारख्या वायूंमुळे होणारे प्रदूषणही कमी होईल. आराखडे सरकारला वा बाजारपेठेत सादर करण्यापूर्वी या आराखड्यांनुसार इमारती प्रत्यक्ष उभारून त्यांची चाचणी घेण्यात येईल. रिअल इस्टेट विकसक, आर्किटेक्ट्स व इतर घरमालक यांच्यापर्यंत हे आराखडे पोहोचावेत, यासाठी ते नागरिकांसाठी प्रसिद्ध केले जातील.

महिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, ‘नागरीकरणाचे भवितव्य असो, मोटार वाहतूक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उत्पादन असो, अथवा पर्यावरणातील बदलाविषयीचे कार्य, भारताला नेहमीच जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा बनण्याचा मान मिळालेला आहे. ‘महिंद्रा टेरी सीओई’ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही केवळ व्यवसायाचा विचार न करता शाश्‍वत विकासावर काम करणार आहोत. भारतातील शहरे व गावे खर्‍या अर्थाने हरित व्हावीत, यासाठी हे आमचे नागरी विकासाचे पाऊल आहे.’

‘टेरी’चे महासंचालक डॉ. अजय माथूर म्हणाले, ‘खास भारतीय वातावरणाशी सुसंगत असे गृहनिर्मितीचे हरीत स्वरुपाचे, कमी खर्चाचे तंत्रज्ञान व साहित्य बनविले जाणे ही काळाची गरज आहे. यातून उर्जेचा किमान खप असलेली आणि आरामदायी जीवनशैली विकसित करणे साध्य होऊ शकेल. महिंंद्रा-टेरी सीओई या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या माहितीमुळे व ज्ञानामुळे विकसकांना स्वयंपूर्ण आराखडे बनविण्यास मदत होईल. देशात हरित इमारती अधिक संख्येने उभारण्यात विकसकांच्या समुदायाला सीओईचे हे मोठेच योगदान ठरेल.’

‘सीओई’ने पुरवलेल्या तंत्रशास्त्रीय आराखड्यांची व्यवस्थित अंमलबजावणी, त्यांचा आढावा या देखरेखीच्या कामाचीबी जबाबदारी सीओई घेईल. उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञ व तज्ज्ञ यांची एक सल्लागार समिती याकामी नेमण्यात येईल. गुरुग्राम येथे उभारण्यात आलेल्या ‘सीओई’ला ‘एसव्हीए-गृह’ पंचतारांकीत पतदर्जा मिळालेला असून, येथे सर्व प्रकारच्या शाश्वत स्वरूपाच्या सुविधांची व डिझाइन्सची उपलब्धता आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link