Next
राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे कार्यक्रम
प्रेस रिलीज
Monday, September 10, 2018 | 03:58 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून विलास भोसले, सतीश यंबल, प्रकाश भट, अशोक रेटवडे, निखिल शहा, गोविंद देशपांडे व रियाज पटेल

पुणे : ‘भारतरत्न एम. विश्वेश्वरैय्या यांच्या स्मरणार्थ साजरा होणार्‍या राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त १५ सप्टेंबर असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनीअर्स डेव्हलपमेंट (एसीईडी) संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती ‘एसीईडी’चे संस्थापक सदस्य प्रकाश भट, चेअरमन अशोक रेटवडे यांनी दिली.

या वेळी निखिल शहा, गोविंद देशपांडे, सतीश यंबल, विलास भोसले, प्रवीण मुंडे, रियाज पटेल उपस्थित होते. १५ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता कमिन्स सभागृह, पत्रकारभवन येथे येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, पुणे महापालिकेतील पंतप्रधान आवास योजना विभागाचे सहसंचालक दिनेश रोकडे उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे ‘हाउसिंग फॉर ऑल’ आणि ‘कन्स्ट्रक्शन सेक्टर स्टार्टअप’ या विषयावर पेपर प्रेझेंटेशन आणि इनोव्हेटिव्ह आयडिया या दोन स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०१८ आहे. दोन्ही स्पर्धांमधील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे ५० हजार आणि २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक असणार आहे. दोन्ही स्पर्धांचे पारितोषिक वितरण २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.  

चर्चासत्राविषयी :
दिवस :
शनिवार, १५ सप्टेंबर २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : कमिन्स सभागृह, पत्रकारभवन, नवी पेठ, पुणे.
अधिक माहितीसाठी : www.acedindia.com किंवा ९४२३० ४९९१३, ७६२०९ ९४५००.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link