Next
डोहोळे व डोहोळेपाडा शाळांना महामानवांच्या प्रतिमा भेट
मिलिंद जाधव
Thursday, June 20, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:

भिवंडी : तालुक्यातील डोहोळे येथे राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते शुद्धोधन अशोक जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मणार्थ कोशिंबी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा डोहोळे येथे संत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा, तर जिल्हा परिषद शाळा डोहळेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा भेट दिल्या.

डोहोळे शाळेतर्फे मुख्याध्यापिका वनिता पाटील, सहशिक्षक रामकृष्ण सिनकर यांनी, तर डोहळेपाडा शाळेतर्फे मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड  या प्रतिमांचा स्वीकार केला. 

या वेळी बोलताना जाधव म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात महामानवांची प्रतिमा समोर असेल, तर नेहमीच त्यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर राहील. त्यांनी केलेला त्याग आणि आजचे सुखाचे दिवस हे विद्यार्थ्यांना आठवतील म्हणून मी वडिलांच्या स्मणार्थ जिल्हा परिषद शाळेत महामानवांच्या प्रतिमा भेट दिल्या आहेत.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search