Next
‘सीड मदर’ रोवतेय विषमुक्त शेतीचे बीज
BOI
Wednesday, October 31, 2018 | 02:44 PM
15 0 0
Share this story

राहीबाई पोपरेअहमदनगर/नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोभाळणे गावात राहणाऱ्या राहीबाई सोमा पोपरे या माऊलीने सुमारे १५० प्रकारच्या गावरान आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या पिकांच्या जातींच्या बियाण्याचे जतन केले आहे. विषमुक्त शेतीचा प्रसार करणे हे त्यांचे ध्येय असून, त्यासाठी त्यांनी २००१पासून हे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सीड मदर’ असे संबोधले जाते. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे ४०० एकर जमिनीवर आज राहीबाईंच्या प्रेरणेने विषमुक्त शेती केली जात आहे. त्यांनी जतन केलेले बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि परराज्यांतही पोहोचले आहे.

रूढ शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या राहीबाईंना शेतीतील रसायनांचा वापर घातक वाटतो. त्यामुळेच विषमुक्त शेतीचा प्रसार करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आणि स्वतःपासून कामाची सुरुवात केली. ‘थोडेच पिकवीन; पण गावठी जातींचीच लागवड करीन आणि विषमुक्त उत्पादनच घेईन’ असा निश्चय त्यांनी केला. त्यातूनच त्यांनी दर्जेदार गावठी जाती पाहून त्यांचे बियाणे जतन करायला सुरुवात केली. २००१पासून त्या विविध पिकांच्या सुमारे १५० प्रकारच्या गावठी जातींचे बियाणे जतन करत आहेत आणि त्यांचे लोकांनाही वाटप करत आहेत. वांगी, भेंडी, पेरू, आंबा, चिंच, पालक, मेथी, वाटाणे अशा विविध पिकांच्या चांगल्या जातींचे बियाणे त्यांनी जपले आहे. 

त्यांनी केलेल्या बियाणे बँकेतील काही बियाणे त्या लोकांना देतात आणि त्यांची लागवड करून त्यापासून अधिक बियाणे तयार करायला सांगतात. अशा प्रकारे त्यांनी अनेकांना विषमुक्त शेतीसाठी प्रोत्साहन दिले आहे. प्रत्येक पीकजातीच्या बियाण्यासाठी त्यांनी घरात वेगवेगळे डबे केले असून, त्या त्या जातीच्या बिया त्यात ठेवल्या जातात. त्यांचे कार्य पाहून समाजातील शेतीविषयक जाणकार व्यक्तींनी त्यांना ‘सीड मदर’ असे संबोधायला सुरुवात केली. 

अहमदनगरमधील अकोले, पाथर्डी, संगमनेर, तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्रंबक, हर्सूल, निफाड या तालुक्यांत त्यांच्याकडील बियाणे वाण पोहोचले आहे. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांतही त्यांच्याकडील बियाण्याला मागणी वाढत आहे. पंजाबमध्येही त्यांनी गव्हाचे बियाणे दिले असून, काही शेतकऱ्यांनीही त्या जातीचे बियाणे जपून ठेवले आहे. त्यांनी जतन केलेल्या पेरू आणि चिकूच्या गावठी जातींचे बियाणे त्यांनी मध्य प्रदेशातही दिले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Asha Sarang About 94 Days ago
Seed mother aiwaji ekhade marathi naaw dile aste. Tyancha contact no please. .
0
0
kavita Deshmukh About 140 Days ago
pl give me her contact no. Good work she s doing.
0
0

Select Language
Share Link