Next
‘हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक’
प्रेस रिलीज
Saturday, July 28, 2018 | 12:04 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जगात, तणाव प्रचंड वाढल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, शारीरिक निष्क्रीयता याचेही प्रमाण वाढत जाते. या तणावाला बळी पडण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी, दररोज कमीतकमी तीस मिनिटे तरी ध्यान आणि व्यायामासाठी दिल्याने हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते,’ असे डॉ. संतोष ढगे (बीएएमएस पीजीपी पंचकर्मा) यांनी सांगितले.

इंडियन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, भारतीयांमध्ये उद्भवणारा हृदयविकाराचा झटका हा ५० टक्के लोकांना पन्नाशीच्या आतील लोकांमध्ये होतो आणि एकूण हृदयविकाराच्या धक्क्यांपैकी पंचवीस टक्के हे चाळीसहून कमी वय असलेल्या लोकांना होतात. खेड्यात राहाणाऱ्या लोकांच्या तुलनेत शहरांमधील लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता तिप्पटीने जास्त असते. हृदयविकार हा प्रचंड ताणतणाव, खाण्याच्या वाईट सवयी, खाण्याच्या सवयी अनियमित, जंक फुड, मद्य आणि धूम्रपान यांमुळे होतो. तणावपूर्ण जीवनशैली आणि कामाचे वाढलेले तास यांमुळे खाण्याच्या सवयी अनियमित झाल्या आहेत. परिणामी, शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे लठ्ठपणा येतो. भारतातील लठ्ठ व्यक्तींची संख्या २०१०मध्ये १७.३ टक्क्यांवरून वाढून २०१४मध्ये १९.५ टक्के झाली आहे.

मद्याच्या नियमित सेवनामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात ज्याला अऱ्हिदमियास म्हणतात. त्यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाणही वाढू शकते. धुम्रपानामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते आणि रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती वाढते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी किंवा तणावाचा सामना करण्यासाठी निकोटीन किंवा मद्य यांसारख्या हानिकारक कृत्रिम उत्तेजकांची गरज नसून, पोषक अन्नाची गरज आहे. यामुळे फक्त व्यायाम करण्याचीच क्षमता वाढते असे नाही, तर आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होता येत असल्याचे डॉ. ढगे यांनी स्पष्ट केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link