Next
‘उपवासासाठी मधुमेहाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करा’
मधुमेहतज्ज्ञ डॉ. सी. राव यांचा सल्ला
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सणासुदीच्या काळात उपवासासाठी मधुमेहाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचा सल्ला वाइस डायबेटीस अ‍ॅंड रिसर्च सेंटरचे संचालक व मधुमेहतज्ज्ञ डॉ. सी. राव यांनी दिला. 

रमजान महिन्याला सुरुवात झाली असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा सल्ला दिला आहे. रोजे करणाऱ्या मधुमेहींनी रमजान महिना सुरू होण्याच्या एक ते दोन महिने आधीच त्यांचा मधुमेह किती नियंत्रणात आहे याची तपासणी करून घ्यावी. मधुमेहामुळे होणार्‍या तीव्र स्वरूपाच्या, तसेच दीर्घकाळ टिकणार्‍या जटील विकारांची आणि जोडीने येणार्‍या आजारांचीही तपासणी करून घ्यावी. रुग्णांच्या एकंदर स्वास्थ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ग्लायसेमिया, रक्तदाब आणि लिपिड्सच्या नियंत्रणाकडे लक्ष देण्याचे डॉ. राव यांनी सुचविले आहे. 
 
ते म्हणाले, ‘मधुमेहींना उपवास करायचा असेल, तर मधुमेहासंदर्भातील आणि उपवासासंदर्भातील सल्ले महत्त्वपूर्ण ठरतात. यातून निर्माण होणार्‍या संभाव्य आरोग्यसमस्या म्हणजे हायपोग्लासेमिया, हायपरग्लासेमिया, डिहायड्रेशन आणि चयापचयात डायबेटिक केटो अ‍ॅसिडोसिससारखी गंभीर स्वरूपाची गुंतागुंत निर्माण होणे. उपवासादरम्यान शरीरातील व्यवस्थांवर खूप ताण येतो आणि सलग किती काळ उपवास केला जातो यावर हा ताण अवलंबून असतो. आपण उपवास करतो तेव्हा शरीर ग्लुकोजचा साठवलेला स्रोत वापरते आणि नंतर ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्यासाठी शरीरातील चरबीचे विभाजन सुरू होते. उपवासादरम्यान शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण, रक्तातील ग्लुकोजची पातळी उपवासामुळे खूप खालावण्याची शक्यता असते.’

डॉ. सी. रावउपवासाचा कालावधी १२ तासांहून अधिक असेल, तर ग्लुकोजची पातळी कधी वर, तर कधी खाली जाण्याचा प्रकारही घडू शकतो. सहसा दिवसातील पहिले जेवण पहाटे घेणार्‍या मधुमेहींमध्ये दुपारी उशिरापर्यंत ग्लायकोजेनची पातळी घसरलेली असते आणि केटोजेनेसिस याच वेळी होतो. जेवण घेतले नाही, तर त्यातून पुढे उपवासाच्या दिवसाच्या सुरुवातीलाच ग्लायकोजेनचा साठा कमी होतो आणि केटोसिस होतो.

‘टाइप टू मधुमेह झालेले रुग्ण सहसा स्थूल असतात आणि त्यांच्या पोटाचा घेर अधिक असतो. रुग्णाचे वजन अधिक वाढल्यास, परिस्थिती अधिक बिकट होते. अधिक इन्सुलिन घेण्याची गरज भासते. म्हणजेच अधिक वजन वाढणे. हे दुष्टचक्र सुरू होते. सौम्य स्वरूपाचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन केलेला विखंडित उपवास मधुमेहाच्या रुग्णांना वजन कमी करण्यासाठी, तसेच रक्तातील ग्लुकोजची पातळी, रक्तदाब व कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो; मात्र उपवास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. रुग्णाने उपवास करण्याच्या सहा ते आठ आठवडे आधी डॉक्टरांकडे जाऊन उपवासामुळे त्याच्या किंवा तिच्या शरीराला किती धोका आहे हे तपासून घ्यावे. उपवास सोडताना खाण्याचे आरोग्यकारक पर्याय निवडणे, घरी ग्लुकोमीटर वापरून नियमित साखरेची पातळी तपासत राहणे, रक्तातील साखर वाढल्याची, तसेच कमी झाल्याची लक्षणे ओळखण्यास शिकणे हे सर्व उपवासादरम्यान निर्णायक असते,’ असे डॉ. राव यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search