Next
दिव्यांग मुलांनी साकारले पर्यावरणपूरक बाप्पा
‘पुणे टीचर अॅक्टिव्हिटी ग्रुप’चा उपक्रम
BOI
Monday, August 26, 2019 | 05:56 PM
15 0 0
Share this article:


पुणे :  पुणे टीचर अॅक्टिव्हिटी ग्रुपतर्फे दिव्यांग व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कात्रज येथील नारायणी धाम मंदिरात हा उपक्रम पार पडला. दोनशे विद्यार्थी व पालक यात सहभागी झाले होते. यासाठी झाँसी राव यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक युवराज बेलदरे, अर्चना शहा, लायन विनय निंबाळकर, लायन सचिन कर्णिक, मोहन दुधाणे, गिरीश लिमन या मान्यवरांच्या हस्ते झाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरती लिमन, दैवत लिमन, अशोक नांगरे, रवींद्र जोशी, हेमंत यादव, अजय बोऱ्हाडे, प्रशांत गडदे, संजय पाटील, मेघना जोशी, पूजा गयावळ आदी शिक्षकांनी सहकार्य केले. यासाठी लागणारी शाडू माती ‘म्हाळू पार्वती प्रतिष्ठान’चे निलेश निकम यांच्यातर्फे मोफत देण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी हा ‘पुणे टीचर अॅक्टिव्हिटी ग्रुप’ स्थापन केला असून, दिव्यांग मुलांना समाजासमोर ठामपणे उभे राहता यावे यासाठी याद्वारे काम केले जाते. याकरता महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी पुणे परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना एकत्र करून विविध समाजपयोगी उपक्रम आयोजित करण्यात येतात.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravindra Joshi About 26 Days ago
धन्यवाद
0
0

Select Language
Share Link
 
Search