Next
महाबँकेतर्फे वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप
प्रेस रिलीज
Thursday, May 24 | 04:18 PM
15 0 0
Share this story

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे वाहतूक पोलिसांना मास्क आणि टोप्यांचे वाटप करण्यात आले. य़ा वेळी बँकेच्या पुणे शहर विभागाचे महाव्यवस्थापक प्रशांत खटावकर, सहायक पोलिस आयुक्त प्रभाकर ढमाले,  बँकेचे सहायक महाव्यवस्थापक अनिल गर्दे उपस्थित होते.

पुणे :  बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे शिवाजीनगर वाहतूक पोलिसांना नुकतेच मास्क आणि टोप्यांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पुणे शहर विभागाचे महाव्यवस्थापक प्रशांत खटावकर आणि सहायक पोलिस आयुक्त प्रभाकर ढमाले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

‘वाहतूक पोलिसांना धुळ आणि उन्हापासून संरक्षण करता य़ावे, यासाठी मास्क आणि टोपी देत आहोत’, असे बँकेच्या पुणे शहर विभागाचे महाव्यवस्थापक प्रशांत खटावकर यांनी सांगितले. 

‘वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात घडतात. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघातांची संख्या कमी होईल’, अशी अपेक्षा सहायक पोलिस आयुक्त प्रभाकर ढमाले यांनी व्यक्त केली. य़ा वेळी महाबँकेचे सहायक महाव्यवस्थापक अनिल गर्दे, पोलिस निरीक्षक शिंदे, वाहतूक पोलिस आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link