Next
‘ड्युकाती’तर्फे भारतात नवीन ‘मॉनस्टर ८२१’ सादर
प्रेस रिलीज
Saturday, May 05 | 11:25 AM
15 0 0
Share this storyनवी दिल्ली : ड्युकाती इंडियाने आज भारतात ९.५० लाख (एक्स-शोरुम इंडिया) इतक्या प्रारंभिक मूल्यामध्ये नवीन ‘मॉनस्टर ८२१’ सादर केल्याची घोषणा केली.

‘मॉनस्टर ८२१’मध्ये ‘मॉनस्टर ९००’चा वारसा सामावलेला आहे. ‘मॉनस्टर ९००’ने आपल्यामधील अस्सल नेक स्पोर्टच्या वैशिष्ट्यासह २५ वर्षांपूर्वी मोटारसायकल विश्‍वामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला होता. या नव्या बाइकमध्ये ‘मॉनस्टर १२००’मधील विविध सौंदर्यात्मक व कार्यक्षम वैशिष्ट्ये देखील आहेत. या नव्या बाइकमध्ये स्टाइल, आकर्षकता व कामगिरीचा सुरेख संगम सामावलेला आहे.

नवीन ‘मॉनस्टर ८२१’ ही अधिक स्ट्रीमलाइन आहे. पुन्हा डिझाइन केलेल्या टँक व टेलसह या बाइकचे लुक अत्यंत चपळ दिसते; तसेच या बाइकमधील नवीन एक्झॉस्ट व हेडलाइट हे दोन्ही क्लासिक व आयकॉनिक आहेत. ‘मॉनस्टर ८२१’मध्ये पहिल्यांदाच कलर टीएफटी डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. या डिस्प्लेवर गाडी सुरू असतानाच गिअर, इंधनाची पातळी याची माहिती दिसते. गतकाळात अनेक मॉनस्टरिस्टने अनुभव घेतलेल्या क्लासिक ड्युकाती येलो पेंटचा वापर करण्यात आला आहे. ही बाइक ड्युकाती रेड व ब्लॅक अशा रंगांमध्ये देखील उपलब्ध असेल.

युरो ४ कॉम्प्लिएंट लिक्विड-कूल टेस्टास्ट्रेटा ११ इंजिन वळणावरी अत्यंत उपयुक्त टॉर्कसंदर्भात कोणतीच तडजोड न करता ९२५० आरपीएममध्ये १०९ एचपीची (८० केडब्ल्यू) अधिक शक्ती देते. ७७५० आरपीएममधील ८.८ किग्रॅमी (८६ एनएम) टॉर्कमुळे ८२१चे इंजिन मजेशीर व सुरक्षित राइडची खात्री देते, जे इतर इंजिनांसाठी शक्य नाही.

ड्युकाती इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सर्गी कॅनोवस गॅरिगा म्हणाले, ‘गेल्या २५ वर्षांपासून मॉनस्टरने जगभरातील बाइकिंग उत्साहींना सातत्याने आनंददायी अनुभव दिला आहे. यंदाचे वर्ष हे मॉनस्टरचे २५वे वर्ष आहे. या खास वर्षामध्ये भारतात नवीन ‘मॉनस्टर ८२१’ सादर करताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. स्लिम व स्पोर्टी मोटारसायल निर्माण करण्याच्या उद्देशासह नवीन ‘मॉनस्टर ८२१’ डिझाइन करण्यात आली आहे. या नव्या बाइकमध्ये ‘स्पोर्ट नेक’ची मूळ संकल्पना आहे आणि ही बाइक राइडिंगचा अधिक आनंद देते.’

‘मॉनस्टर ८२१’मध्ये ड्युकाती सेफ्टी पॅकचे वैशिष्ट्य आहे. ज्यामध्ये बॉश ९.१ एमपी एबीएस सिस्टम व ड्युकाती ट्रॅक्शन कंट्रोल आहे आणि या दोघांमध्ये अ‍ॅडजस्टेबल इंटरव्हेशन लेव्हल्स आहेत. पॉवर मोड्सच्या माध्यमातून अधिक शक्ती व थ्रॉटल प्रतिसाद समायोजित करता येऊ शकतात. राइडिंग मोड्स एबीएस, ड्युकाती ट्रॅक्शन कंट्रोलचे सुलभपणे समायोजन करण्याची सुविधा देतात.

पॉवर मोड्स राइडर्सना नव्या ‘मॉनस्टर ८२१’ला प्रत्येकी विभिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या तीन विविध मोटारसायकल्समध्ये बदलण्याची सुविधा देतात. ‘मॉनस्टर ८२१’मध्ये ब्रेमो ब्रेक्ससह ड्युअल ३२० मिमी डिस्क्स व पुढील बाजूस एम४-३२ मोनोब्लोक रॅडियल कॅलिपर्स अशी सर्वोत्तम उपकरणे आहेत. सुधारित सस्पेशन सिस्टममध्ये पुढील बाजूस ४३ मिमी फोर्क आणि स्प्रिंग प्रीलोड अ‍ॅडजस्टमेंट असलेला एक रिअर मोनोशॉक आहे. नवीन ‘मॉनस्टर ८२१’ मध्ये शॉडसह पुढील बाजूस पिरेली डायब्लो रोस्सो घ्घ्घ् १२०/७० टायर आणि मागील बाजूस १८०/५५ टायर आहेत.

‘मॉनस्टर ८२१’मध्ये ड्युकाती क्विक शिफ्ट (डीक्यूएस) अप/डाऊन ही रेसिंगसाठी उपयुक्त अशी इलेक्ट्रॉनिक सिस्टम देखील आहे. ज्यामुळे रेसिंगदरम्यान क्लचचा वापर न करता गिअर्स बदला येतात. नवीन ‘मॉनस्टर ८२१’साठी बुकिंग्ज सुरू झाल्या आहेत आणि दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेंगळुरू, कोची व कोलकाता येथील सर्व ड्युकाती डिलरशिप्समध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात डिलिव्हरींना सुरूवात होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link