Next
अॅक्सिस बँकेचा तटरक्षक दलासोबत सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 03:11 PM
15 0 0
Share this story

अॅक्सिस बँक आणि  भारतीय तटरक्षक दलातील सामंजस्य करारप्रसंगी डीआयजी कौल व अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष संजय सिलस

मुंबई : अॅक्सिस बँकेने, भारतीय तटरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना विशेष बँकिंग सेवा देण्यासाठी या दलाशी सामंजस्य करार केला आहे. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या कराराचेच हे नूतनीकरण आहे. यामुळे बँकेने  भारतीय तटरक्षक दलाला सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्याची व त्यांच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याची  बांधिलकी आणखी अधोरेखित केली आहे.

भारतीय तटरकक्षक दलाच्या अॅडमिनिस्ट्रेशन विभागाचे प्रिन्सिपल डायरेक्टर डीआयजी एन.के.कौल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष व ब्रँच बँकिंग प्रमुख संजय सिलस व बँकेतील अन्य मान्यवर अधिकारी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना, अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष व ब्रँच बँकिंग प्रमुख संजय सिलस म्हणाले, ‘भारतीय तटरक्षक दलाला सेवा देताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो.  आम्ही यापुढेही भारतीय तटरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना विशेष बँकिंग सेवा देत राहू. कोठेही बँकिंग सेवा उपलब्ध करण्याबरोबरच, बँक इतरही काही विशेष लाभ देणार आहे, जसे ३० लाख रुपयांचे मोफत वैयक्तिक अपघात विमा कवच (एकूण ३० लाख रुपयांच्या कायमस्वरूपी अपंगत्व कव्हरेजसह), ३० लाख रुपयांपर्यंत अंशतः अपंगत्व कवच, दोन लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक लाभ (भारतीय तटरक्षक दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी), विमानतळावरील लाउंजची सुविधा व अन्य विशेष कर्ज सुविधा. अॅक्सिस बँक ‘पे टू पेन्शन’ योजना संरक्षण सेवांसाठी यापुढेही कायम ठेवत, सर्व सुविधा तटरक्षक दलातील कर्मचाऱ्यांनाही लागू होतील. त्यांना अॅक्सिस बँकेद्वारे पेन्शन काढता येईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link