Next
आदित्य माळवे यांच्या पुढाकाराने निर्माल्य संकलन
प्रेस रिलीज
Wednesday, September 26, 2018 | 03:02 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील प्रभाग क्रमांक सातचे भारतीय जनता पक्षाचे  नगरसेवक आदित्य माळवे यांच्या पुढाकाराने शिवाजीनगरमधील विविध भागात ‘निर्माल्य द्या रोप घ्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा व गणेश मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमांतर्गत शिवाजीनगरमधील विविध गणेश मंडळांकडून निर्माल्य गोळा करण्यात आले. या बदल्यात त्यांना रोपांचे, तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम राबवण्यासाठी नगरसेवक माळवे यांच्यातर्फे शिवाजीनगरमध्ये निर्माल्य हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करण्यात आला होता. या प्रसंगी नगरसेवक माळवे यांनी मंडळांना प्लास्टिक वापर बंद करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search