Next
‘आझम कॅंपस’मध्ये योग दिन साजरा
प्रेस रिलीज
Friday, June 22 | 05:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) व अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये (आझम कँपस) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

‘योग दिनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सकाळी योगशिबिराचे आयोजन केले होते,’ अशी माहिती इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांनी दिली.

यानिमित्त योगतज्ज्ञ आनंदाचार्य पोनागंती यांनी योगाचे महत्त्व सांगितले. एमसीई सोसायटीचे सहसचिव प्रा. इरफान शेख, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी-डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप, अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. किरण भिसे उपस्थित होते.

योगतज्ज्ञ आनंदाचार्य पोनागंती म्हणाले, ‘योग हा शरीर आणि मस्तिष्क यांचे संतुलन राखून प्रकृतीच्या जवळ जाण्याचा सर्वात सुरक्षित माध्यम आहे. योग हा व्यायामाचा प्रकार आहे. ज्यामध्ये शरीराचे संतुलन आहार आणि श्वासाचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.’ या वेळी योगतज्ज्ञांनी प्राणायाम व योगासनाचे प्रात्यक्षिके दाखवली. यामध्ये ताडासन, भुजंगासन, वज्रासन, नौकासन आदी आसनांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link