Next
प्रियदर्शन जाधवचे दिग्दर्शनात पदार्पण
प्रेस रिलीज
Wednesday, May 02 | 04:26 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अभिनेता प्रियदर्शन जाधवने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले असून, ‘खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ अशी धमाकेदार टॅगलाईन असलेला ‘मस्का’ हा त्याचा पहिला मराठी चित्रपट एक जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सादर करण्यात आला. 

मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित ‘मस्का’ हा चित्रपट रॉमकॉन शैलीचा आहे. आजवर सोज्ज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘मस्का’च्या टीझरमध्ये भन्नाट अशा गर्ल नेक्स्ट डोअरच्या बोल्ड भूमिकेत दिसते आहे; तसेच या टीझरमध्ये अनिकेत विश्वासराव आणि चिन्मय मांडलेकर यांच्यातील संवादावरून या कथेत स्त्री पात्राची भूमिका जबरदस्त, धमाल आणणार आहे असे दिसते. 

याशिवाय अभिनेते शशांक शेंडे, विद्याधर जोशी आणि प्रणव रावराणे हे कलाकार यात आहेत. ‘मस्का’ मध्ये वेगवेगळी नावे वापरून पुरुषांची फसवणूक करणारी एक स्त्री असल्याचे दिसते ती नेमकी कोण? याचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे.

मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’चे निर्माते प्रशांत पाटील आहेत. प्रस्तुती सायली जोशी,सचिन नारकर, विकास पवार आणि सहप्रस्तुती आकाश पेंढारकर आणि विनोद सताव यांची आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार चिनार – महेश यांनी स्वरसाज चढविला आहे. चित्रपटाचे छायांकन अमलेंदू चौधरी यांनी केले आहे. निलेश गावंड संकलक आहेत. अत्यंत हटके विषयावरील सस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी असा मनोरंजनाचा धमाका असलेला ‘मस्का’ हा चित्रपट येत्या एक जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link