Next
मौजे नांदगाव येथे पशुपालक शेतकरी शिबिर
BOI
Friday, November 23, 2018 | 02:00 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोशहापूर : ठाणे जिल्हा परिषद व शहापूर पंचायत समिती यांच्यातर्फे एक दिवसीय तालुकास्तरीय पशुपालक शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर किन्हवलीनजीक मौजे नांदगाव (सो) येथे २७ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता होणार असून, ते विनामूल्य आहे.

या शिबिरात पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विनोद राईकवार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार हे विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार आहेत. ते दुग्धव्यवसाय, शेळी व कुक्कुटपालनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत; तसेच पशुसंवर्धन विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत. त्या शिवाय दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी चारायुक्त शिवार कसे करावे, रोगमुक्त जनावर व आदर्श गोठा, गायी-म्हैशींचे आहारशास्त्र या पशुसंवर्धनविषयक ज्ञानाची तांत्रिक माहिती देऊन मार्गदर्शनही केले जाणार आहे.

शिबिराचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व कृषी समिती सभापती उज्ज्वला गुळवी यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, समाजकल्याण सभापती निखील बरोरा, शहापूर पंचायत समिती सभापती शोभा मेंगाळ, उपसभापती वनिता भेरे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.

‘या शिबिराला शहापूर तालुक्यातील दुधउत्पादक शेतकरी, शेळीपालक, पोल्ट्री व्यवसायिक, सुशिक्षित बेरोजगार युवक, बचत गटातील महिलांनी उपस्थित राहावे,’ असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. जी. देशमुख, डॉ. जी. जी. चांदोरे, डॉ. अविनाश कराटे व किन्हवली पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक विस्तार अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 63 Days ago
Admirable activity . Should be taken by others , especially , at taluka places , where it would be easily accessible to villages .
0
0

Select Language
Share Link
 
Search