Next
‘इंटरनेटच्या लोकशाहीकरणासाठी विशेष तंत्रज्ञान धोरणाची गरज’
प्रेस रिलीज
Tuesday, October 09, 2018 | 03:07 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान धोरणाची आवश्यकता असून, इंटरनेट क्रांतीचा सर्वाधिक फायदा विविध भारतीय भाषांचा वापर करणाऱ्या समाजाला होईल,’ असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

‘दी क्विंट’द्वारे आयोजित ‘बोल : लव युअर भाषा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यवसाय वृद्धीसाठी भारतीय भाषांना डिजिटल स्पेस बनविण्यावर देखील त्यांनी जोर दिला. भारतीय भाषांमधील डिजिटल कंटेंट व्यावसायिक पातळीवरही सुसंगत कसा बनवता येईल आणि त्याचवेळी तो देशभरातील प्रेक्षकांपर्यंत सहजसोप्या पद्धतीने कशाप्रकारे पोहोचविता येईल, यावर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रात बोलताना गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन म्हणाले, ‘भारतीय भाषांमध्ये व्यवसायाची प्रचंड क्षमता आहे. खरी गरज या क्षमतांना निष्कर्षात बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची आहे. २०२१पर्यंत भारतीय भाषांमध्ये जाहिरातींचा बाजार सुमारे सहा हजार कोटींपर्यंत पोहोचेल. इंटरनेटवर भारतीय भाषांमध्ये सामग्री व्यवसाय वाढीसाठी प्रचंड क्षमता आहे. भारतात यु-ट्यूबवर पाहण्यात येणारी ९५ टक्के सामग्री ही इंग्रजीमधील नसते यावरूनच हे सिद्ध होते.’  

बुद्धीला खाद्य देणाऱ्या या चर्चासत्रात अनेक विषयांचा समावेश होता. तामिळ, मल्याळम, गुजराती, बंगाली आणि भारतातील इतर प्रादेशिक भाषांमधील जाहिरातींना इंग्रजी जाहिरातींचे प्राबल्य असलेल्या बाजारपेठेत ग्राहक आहेत का, इतर प्रादेशिक भाषांबरोबरच हिंदीलाही ब्रँड्स, एजन्सी, मार्केटर्सकडून फारसे हितावह मानले जात नाही का, वापरकर्त्यांना त्यांच्यासाठी बनलेली जाहिरात कितीवेळा त्यांच्या मातृभाषेत दिसते, या आणि अशा इतर प्रश्नांचा वेध या वेळी घेण्यात आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link