Next
‘मेक मोका’द्वारे ‘जेटपॅक’ची भारतीय आवृत्ती सादर
प्रेस रिलीज
Wednesday, April 25, 2018 | 12:53 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मेक मोकाने जेटपॅक जॉयराइडची भारतीय आवृत्ती सादर केली. जेटपॅक जॉयराइड ची मूळ निर्मिती ऑस्ट्रेलियाच्या हाफब्रिक स्टुडिओजने केलेली आहे. मेक मोका हे सांस्कृतिक कथा, भारत केंद्रित गेम्स विकसित आणि प्रकाशित करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

मेक मोका हा भारतातील पहिला प्रकाशक आहे, ज्याने भारतीय बाजारपेठेसाठी एका जागतिक स्तरावर प्रसिद्ध ठरलेल्या गेमची भारतीय आवृत्ती सादर केली आहे. या गेममध्ये आता बॅरी स्टीकफ्राइजचा नवीन अवतार बॅरीकांत दिसणार आहे. बॅरीकांत हा एक अब्जाधीश-प्लेबॉय-जिनियस आहे जो अत्यंत बुद्धिमान आहे आणि आपल्या कट्टर शत्रुंवर कुरघोडी करण्यासाठी अनेक अद्भुत जेटपॅक आणि गॅजेट्स बनविण्याची त्याची इच्छा आहे.

मेक मोका या सादरीकरणासह यू ट्यूबवर गाजत असलेल्या तन्मय भट, बिस्व कल्याण रथ आणि झाकीर खान या व्यक्तींना गेममधील पात्रे म्हणून सादर करत आहे. यू ट्यूबवरील या प्रभावी व्यक्ती या गेममध्ये मुख्य खलनायक म्हणून दिसणार आहेत. हा गेम तीन वेगवेगळ्या जगांशी निगडीत आहे. भारतीय अॅप स्टोरमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीची जागा हा गेम घेईल आणि लॉन्च झाल्यानंतर पहिल्या वर्षाभरात १० मिलियन डाऊनलोडचा टप्पा हा गेम गाठेल, असा मेक मोका टीमचा अंदाज आहे.

मेक मोकाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक अर्पिता कपूर म्हणाल्या, ‘जेटपॅक जॉयराइडची भारतीय आवृत्ती सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या गेमने जगभरातील सर्व मोबाइल खेळाडूंची मने जिंकली आहेत. आम्ही केवळ अशाच गेम्ससोबत भागीदारी करतो, ज्यांना स्थानिक रूप देऊन त्यातून काही लाभ होऊ शकत असेल. भारतीय खेळाडूंना आम्ही तयार केलेली पात्रे आणि कथा तर आवडतीलच, पण त्याचबरोबर त्यांना जागतिक दर्जाच्या खेळाचा अस्सल अनुभव देखील मिळेल. आम्हाला खात्री आहे की ‘जेटपॅक जॉयराइड: इंडिया एक्स्क्लुझिव्ह’ भारतीय खेळाडूंना नक्की आवडेल आणि जागतिक गेम्सचे भारतीय खेळाडूंसाठी भारतीयीकरण कसे करावे याचा मापदंड देखील तो स्थापित करेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link