Next
फुलरटनतर्फे चाळीस हजारपेक्षा अधिक पशूंवर उपचार
पशू विकास दिनानिमित्त देशभरात विशेष उपक्रम
प्रेस रिलीज
Monday, December 17, 2018 | 05:46 PM
15 0 0
Share this story


पुणे : फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (फुलरटन इंडिया) या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीने पशू विकास दिनानिमित्त देशभरातील १३ राज्यांमधील ४० हजारपेक्षा जास्त पशूधनाची आरोग्य तपासणी केली आणि आवश्यक ती वैद्यकीय मदत दिली. 

कंपनीच्या ‘उदय’ या सामाजिक जबाबदारी उपक्रमाअंतर्गत हा देशातील सर्वात मोठा पशू सेवा उपक्रम राबवला जातो. या मध्ये मुख्यत्वे ग्रामीण भागातील पशूधारकांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये त्यांना प्राण्यांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्राण्यांची तपासणी करून औषधे दिली जातात. आवश्यक ते उपचार केले जातात. 

या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात देशातील विविध भागांमधील फुलटरन इंडियाचे तीन हजारपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात या उपक्रमांतर्गत सुमारे सहा हजार पशूंवर उपचार झाले. राज्यातील सुमारे अठराशे ग्रामीण घरांना तर देशभरातील सुमारे १५ हजार २०० घरांना या उपक्रमाचा फायदा झाला. 

२०१५ मध्ये या उपक्रमांतर्गत एकाच दिवसात सर्वाधिक पशूंवर उपचार करण्याच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये झाली आहे.  

या उपक्रमाबाबत बोलताना फुलरटन इंडियाच्या विपणन विभागाच्या महा-व्यवस्थापक शिल्पा देसाई म्हणाल्या, ‘फुलरटन इंडियाने वंचित समुदायांच्या राहणीमानात सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील लोक आपल्या उत्पन्नासाठी पशूधनावर अवलंबून असतात. परंतु, पशू सेवेबाबत जागरूकतेच्या अभावामुळे चांगल्या आरोग्यसेवा मिळत नाहीत. आम्ही हे आव्हान स्वीकारले आणि प्राण्यांना मोफत उपचार आणि वैद्यकीय सेवा देण्यासाठी पशू विकास दिनाचे आयोजन केले. या उपक्रमाला मागील वर्षांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link