Next
‘डीकेटीई’ची विद्यार्थिनी सारिका बोरीकर स्पेनमध्ये सन्मानित
प्रेस रिलीज
Tuesday, June 25, 2019 | 02:25 PM
15 0 0
Share this article:

स्पेन येथे ‘इटमे २०१९’ कार्यक्रमात सारिका बोरीकर हिच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना ‘डीकेटीई’चे डॉ. यू. जे. पाटील, डायरेक्टर डॉ पी. व्ही. कडोले, प्रा. एल. जी. पाटील.

इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये एमटेक पदवीप्राप्त विद्यार्थिनी सारिका सुनील बोरीकर हिला स्पेन येथे झालेल्या ‘इटमे सस्टेनेबल इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड २०१९’अंतर्गत ‘सॅनिटरी नॅपकीन्स- अ ग्रीनर अ‍ॅप्रोच’ या विषयावरील एमटेक संशोधनास ‘रिसर्च अ‍ॅंड इनोव्हेशन एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. चार लाख रुपये व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘डीकेटीई’चे उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांनी तिला प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले आहे. 

हा पुरस्कार सोहळा स्पेन येथे आयोजित ‘इटमे २०१९’ या टेक्स्टाइल एक्झिबिशनमध्ये झाला. वस्त्रोद्योग व फॅशन उद्योगाला चालना देण्यासाठी टेक्स्टाइल मशिनरी मॅन्युफॅक्चरसची युरोपियन समिती सीमाटेक्स यांनी ‘इटमे २०१९’ येथे ‘इटमे इनोव्हेशन लॅब’ची स्थापना केली आहे.  टेक्स्टाइल उद्योगाशी संबंधित उत्कृष्ट संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी ‘इटमे सस्टेनेबल इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’ने ‘इंडस्ट्री एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड फॉर टेक्स्टाईल अ‍ॅंड गारमेंट मॅन्युफॅक्चरस’ व ‘रिसर्च अ‍ॅंड इनोव्हेशन एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ या दोन विभागांमध्ये पुरस्कार जाहीर केले. सस्टेनेबल टेक्स्टाइल प्रॉडक्टची निर्मिती करणाऱ्या टेक्स्टाइल व गारमेंट उत्पादकांसाठी इंडस्ट्री एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड व उत्तम सस्टेनेबल संशोधनात्मक एमटेक प्रकल्पास ‘रिसर्च अ‍ॅंड इनोव्हेशन एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’साठी जगभरातून अ‍ॅप्लिकेशन्स मागविण्यात आले होते. जगभरातून विविध नामांकित इन्स्टिट्यूटसनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.
‘’
‘डीकेटीई’ची विद्यार्थिनी सारीका हीने ‘सॅनिटरी नॅपकीन्स-अ ग्रीनर अ‍ॅप्रोच’ या विषयावरील प्रकल्प पाठविला होता. असोसिएशन ऑफ टेक्स्टाइल्स मशिनरी मॅन्युफॅक्चरिंगचे ट्रेनिंग अ‍ॅंड मेंबर रिलेशन्स मॅनेंजर जॉर्जीओ कॅलक्युली, इएनएसएआटीचे (फ्रान्स) प्राध्यापक व्लेदान कॉनकर, एचेन युनिव्हर्सिटीचे (जर्मनी) आरडब्ल्युटीएच डायरेक्टर थॉमस ग्राइज, दी सोसायटी ऑफ फायबर सायन्स अ‍ॅंड टेक्नॉलॉजीचे (जपान) प्रेसिडेंट ताकेशी किकुटानी, नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या (अमेरिका) कॉलेज ऑफ टेक्स्टाइल्सचे प्राध्यापक बेनाम पुरदेहीनी यांनी जगभरातून आलेल्या प्रकल्पांचे परीक्षण केले व प्रकल्पाची विविध निकषांवर सविस्तर पडताळणी केली व डीकेटीईच्या सारिकाला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर केले. 

‘इटमे २०१९’मध्ये झालेल्या पुरस्कार सोहळया्त सारिका बोरीकर हिच्यातर्फे तिचे एमटेक प्रकल्पाचे गाइड प्रा. डॉ. पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यावेळी उपस्थित आर अ‍ॅंड आय अ‍ॅवॉर्डचे परीक्षक प्रा. ब्लादेन कॉनकर म्हणाले, ‘जगभरातून विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प हे नवकल्पनेवर आधारित व पर्यावरणास अनुकुल आहेत त्यामुळे पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आहे.’

‘या प्रकल्पामध्ये उसाच्या कांड्यापासून बनविलेला पल्प, बनाना पल्प, लोकर याचा वापर करून पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीनची निर्मिती केली आहे. ‘डीकेटीई’ व सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉन वोव्हन्स येथील अत्याधुनिक मशिनरीवर तयार सॅनिटरी नॅपकीनच्या सर्व गुणधर्माची चाचणी केली. या प्रकल्पामध्ये तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकीन्सना अ‍ॅटीमायक्रोबियल ट्रीटमेंट दिली आहे. त्यामुळे हे नॅपकीन वापरण्यास आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहेत,’ असे सारिका बोरीकर हिने सांगितले.

या कार्यक्रमास ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. एल. जी. पाटील, प्रा. डॉ. वाय. एम. इंडी उपस्थित होते. सारिका बोरीकरला प्रा. पी. एम. काटकर व प्रा. एस. व्ही. चव्हाण यांनी को-गाइड म्हणून मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी तिचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search