Next
खासदार शिरोळेंच्या हस्ते कोळावडे गावातील रस्त्यांचे भूमिपूजन
प्रेस रिलीज
Tuesday, January 15, 2019 | 05:33 PM
15 0 0
Share this article:पुणे : जिल्ह्यातील कोळावडे या गावातील तीन रस्त्यांचे भूमिपूजन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. आदर्श ग्राम योजनेअंतर्गत हे गाव खासदार अनिल शिरोळे यांनी दत्तक घेतले आहे. या योजनेमधील हे तिसऱ्या टप्प्यातील गाव आहे. या आधी या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील वडगाव शिंदे, कासारी ही गावे दत्तक घेण्यात आली आहेत.

या गावच्या गरजा लक्षात घेत त्यानुसार खासदार शिरोळे यांच्या पुढाकाराने या गावाचा ग्रामविकास आराखाडा ग्राम पंचायतीची मंजुरी घेऊन तयार करण्यात आला. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडून तो मंजूर करून घेतला गेला व  त्यानंतर विकासकामांची सुरुवात या तीन रस्त्यांच्या भूमिपुजनाने करण्यात आली.मुळशी तालुक्याचे माजी सभापती महादेव कोंढारे, सरपंच सयाजी आढाव, उपसरपंच स्वाती येनपुरे, माऊली कांबळे, दत्ता उभे व अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. खासदार निधीमधून गावातील अनेक कामे या नंतर मार्गी लागतील, असा विश्वास या वेळी खासदार शिरोळे यांनी ग्रामस्थांना दिला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 180 Days ago
Is the work in progress ? When is it supposed to To be completed ?
0
0

Select Language
Share Link
 
Search