Next
रणवीर तयारी करतोय ‘कपिल देव’ बनण्याची
कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार दीपिकाही?
BOI
Thursday, January 31, 2019 | 06:30 PM
15 0 0
Share this story


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या ‘८३’ या बायोपिकची सध्या चित्रपट वर्तुळात चर्चा आहे. अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार असून त्याने कपिल देव बनण्याची तयारी सुरू केल्याचे समजले आहे. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोणदेखील या चित्रपटात असण्याची चर्चा रंगली आहे, मात्र अद्याप याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. 

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २५ जून १९८३ ही तारीख सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने या दिवशी क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. १९८३च्या या विश्वचषकावर आधारित आगामी ‘८३’ हा चित्रपट असणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांचा हा जीवनपट असणार आहे. अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार असून कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणला विचारण्यात आले आहे. दीपिकाने या भूमिकेसाठी होकार दिल्यास रणवीर-दीपिका या ऑफस्क्रीन जोडीला लग्नानंतर पहिल्यांदा ऑनस्क्रीन एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. 

जानेवारी २०१९पासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले असून दिग्दर्शक कबीर खान यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. २०१८ हे वर्ष रणवीरसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आणि यशस्वी ठरले. चित्रपटांबरोबरच त्याचे आणि दीपिका पदुकोणचे लग्न ही त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना होती. ‘सिम्बा’च्या यशाने त्याच्या नवीन वर्षाची सुरुवातही जोरदार झाली आहे. आता कपिल देव यांच्या बायोपिकमधून पुन्हा एकदा एक महत्त्वाची आणि लोकांच्या जवळ जाणारी व्यक्तीरेखा साकारण्याची संधी रणवीरला मिळत आहे. त्यामुळे हे वर्षही त्याच्यासाठी यशस्वी ठरणार का, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link