Next
‘गोदरेज’च्या एकत्रित निव्वळ नफ्यात वाढ
प्रेस रिलीज
Thursday, August 02, 2018 | 01:09 PM
15 0 0
Share this story

मुंबई : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस्‌ लिमिटेड (जीसीपीएल), या ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या (एफएमसीजी) अग्रगण्य उदयोन्मुख कंपनीने ३० जून २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे आर्थिक निष्कर्ष नुकतेच जाहीर केले आहेत. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ८० टक्क्यांनी वाढ झाली असून, १:२ प्रमाणात लाभांश भाग जारी केले आहेत.

आर्थिक वर्ष २०१८च्या पहिल्या तिमाहीच्या कामगिरीचा सारांश असा : आर्थिक वर्ष २०१९च्या पहिल्या तिमाहीची एकत्रित स्थिर निव्वळ विक्री वर्षागणिक १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १४ टक्के एवढ्या मोठ्या व्हॉल्यूम वृद्धीमुळे, भारतातील व्यवसायाची विक्री वर्षागणिक १४ टक्क्यांनी वाढली. आंतरराष्ट्रीय व्यवसायाची विक्री स्थिर चलनावर आधारित वर्षागणिक सात टक्क्यांनी वाढ झाली.

आर्थिक वर्ष २०१९च्या पहिल्या तिमाहीचे एकत्रित स्थिर चलन ईबीआयटीडीए २६ टक्क्यांनी वाढले. पहिल्या तिमाहीचा एकत्रित निव्वळ नफा आणि ईपीएस (अपवादात्मक बाबीं आणि वन-ऑफ शिवाय) ३६ टक्क्यांनी वाढला. संचालक मंडळाने २०० टक्के एवढा अंतरिम लाभांश जाहीर केलेला आहे (दोन रुपये प्रति भाग) आणि आवश्यक त्या मान्यतेच्या अधीन राहून, धारण केलेल्या प्रत्येक दोन समभागांसाठी एक समभाग या प्रमाणात लाभांश भाग जारी करण्याची घोषणा केलेली आहे.

२०१९च्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या आर्थिक कामगिरीवर भाष्य करताना गोदरेज समूहाच्या अध्यक्षा निसाबा गोदरेज म्हणाल्या, ‘२०१९ या आर्थिक वर्षाची सुरुवात आपल्यासाठी चांगली झाली, जी बहुतेक भौगोलिक क्षेत्रांमध्ये आणि संवर्गांमध्ये बाजाराच्या वृद्धीपेक्षा फायदेशीर ठरली. मजबूत ग्रॉस मार्जिन एक्सपान्शनमुळे आपली स्थिर चलन विक्री १०% ने वाढली आणि ईबीआयटीडीए २६% ने वाढले. भारतात आपण विक्रीतील वृद्धी १४% एवढी नोंदवली, ज्यात व्हॉल्यूम ग्रोथ १४% एवढी होती आणि सर्व संवर्गांमध्ये दोनअंकी वृद्धी झाली. आपल्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात, इंडोनेशियामध्ये सुधारणा झाली, तर आपली आफ्रिकेतील कामगिरी तुलनेने मंदावलेली राहिली.’

‘ग्राहकांच्या मागणीत सुधारणा होत आहे आणि ही सुधारणा यापुढेही अशीच चालू राहील अशी आपल्याला अपेक्षा आहे. भारतात शहरी आणि ग्रामीण भागातील वृद्धीमध्ये सुधारणा होण्याची आपल्याला अपेक्षा आहे, तर पुनर्चलनीकरणानंतर, जीएसटीची अंमलबजावणी नीटपणे झाल्यानंतर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील वृद्‌धी शहरी भागाला मागे टाकील. वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांसह आपण नवकल्पनांची गती वाढवीत आहोत,’ असे गोदरेज यांनी सांगितले.

‘आर्थिक वर्ष २०१९ हे आपल्यासाठी नवीन उत्पादने बाजारात आणण्याच्या दृष्टीने सर्वाधिक सक्रिय वर्ष असणार आहे. त्याचबरोबर, आपण आपल्या खर्चाचे व्यवस्थापन रास्तपणे करीत आहोत आणि भविष्यातील शाश्वत वृद्धीसाठी स्पर्धात्मक ब्रँड गुंतवणूक करीत आहोत. एकूणच, बाजारपेठेपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी आणि उद्योगामध्ये अग्रणी राहून परतावा देण्यासाठी आपण सदैव अधिक चपळ राहण्यावर, नवकल्पनांची गती वाढवण्यावर, आपला गो-टू-मार्केट दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि आपल्या महत्त्वाच्या टॅलेंटमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link