Next
समरधुरंधर- शिवरायांच्या आग्र्यावरील गरुडझेपेची कहाणी
BOI
Wednesday, May 23 | 10:51 AM
15 0 0
Share this story

शिवाजी महाराजांची रोमांचक जीवनकहाणी पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटत राहते. कारण त्यांच्या आयुष्यात तीनशेपेक्षा अधिक संस्मरणी घटना आहेत. त्यापैकी काही घटना स्तिमित करून सोडणाऱ्या आहेत. प्रस्तुत पुस्तक हे शिवरायांच्या आग्र्यावरील गरुडझेपेची कहाणी आहे. हे पुस्तक म्हणजे डॉ. केदार फाळके यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा विद्याचरण भालचंद्र पुरंदरे यांनी केलेला भावानुवाद आहे. प्रारंभी त्यांनी निजामशाही, आदिलशाहीवर लेखन केले आहे.

दुसऱ्या प्रकरणात १६५०च्या काळातील हिंदुस्थानावर प्रकाश टाकला आहे. तिसऱ्या प्रकरणात शहाजी राजांना अटक आणि शिवरायांच्या मुघलांशी आलेला संबंध याविषयी, तर नंतर अफझलखानाच्या वधाविषयी लिहिले आहे. शाईस्ताखानाची बोटे तोडली, सूरतेची लूट, महाराजा जयसिंहाची स्वारी या टप्प्यांतून पुढे आग्र्याहून सुटकेचा प्रसंग रंगविला आहे. आग्र्याहून सुटकेनंतरच्या घटनांचाही वेध घेतला आहे.

प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन्स
पाने : ३०५
किंमत : ३५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link