Next
‘अॅप्पी फिझ’तर्फे ‘फिल द फिज’ मोहिमेची सुरुवात
प्रेस रिलीज
Friday, May 11 | 12:37 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘पार्ले अॅग्रो’ या सर्वात मोठ्या भारतीय पेय उत्पादकांनी ’अॅप्पी फिज’ या ब्रँडसाठी त्यांनी आखलेल्या १०० कोटी रुपयांच्या ‘फिल द फिज’ विपणन मोहिमेची घोषणा केली. त्यांचा नवा ब्रँड अॅम्बेसेडर सलमान खानचा समावेश असलेली ही पहिलीच मोहीम आहे.

२०१८च्या शेवटापर्यंत ब्रँडची उलाढाल पाच हजार कोटींपर्यंत नेणे आणि फळे आणि ‘फिज’च्या विभागाची उलाढाल येत्या काही वर्षांत चार हजार कोटींपर्यंत नेण्याच्या कंपनीच्या एकूण योजनांचा ही मोहीम एक भाग आहे. अॅप्पी फिज हा पार्ले अॅग्रोचा वेगाने वाढणारा ब्रँड आहे. आता ही कंपनी भारतीय पेय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याचा आणि आपल्या उपविभागांमध्ये आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत आहे.

ग्राहक कृत्रिमरित्या कार्बन डायऑक्साईडचा समावेश असलेल्या पेयांपासून दूर जात असताना या संधीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने ब्रँडची सातत्याने वाढ करण्यासाठी ब्रँडचा नवा चेहरा म्हणून सलमान खानसोबत ‘फिल द फिज’ ही नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सलमान खानचे स्टायलिश, माचो आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व अॅप्पी फिजच्या बोल्ड आणि टोकदार व्यक्तिमत्त्वाला साजेसे असल्याने त्याची ब्रँडचा नवा चेहरा म्हणून निवड करण्यात आली आहे.

हा ६५० कोटी मूल्यांचा ब्रँड फ्रूटफिज पेयांच्या बाजारपेठेत आघाडीवर आहे आणि या ब्रँडच्या स्थापनेपासून २०१८मध्ये पहिल्यांदाच या ब्रँडच्या विपणन मोहिमेसाठी इतकी मोठी रक्कम उपलब्ध होत आहे. भारतभरातील लाखो ग्राहकांसोबतचे बंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या नव्या मोहिमेबद्दल पार्ले अॅग्रोच्या सह महाव्यवस्थापक आणि सीएमओ नादिया चौहान म्हणाल्या, ‘गेल्या काही वर्षांपासून अॅप्पी फिजची होणारी दोन आकडी वाढ कायम राखत फळे आणि फिज पेयांच्या विभागात या उत्पादनाचे स्थान अधिक बळकट करण्याचा उद्देश या नव्या मोहिमेमागे आहे. हा ब्रँड आणि त्यातून निर्माण झालेला विभाग यासंदर्भात आमच्या दमदार दृष्टिकोनाच्या दिशेने आमच्या नव्या ब्रँडचा चेहरा म्हणून सलमान खानची महत्त्वाची भूमिका असणार आहे. २०१८मध्ये या ब्रँडसाठी वितरण, रीकॉल आणि प्राधान्यक्रम ही महत्त्वाची उद्दिष्टे असतील.’

या सहयोगाबद्दल सलमान खान म्हणाला, ‘अॅप्पी फिजची नवी मोहिम फारच उत्साहवर्धक आहे. हे उत्पादन आणि नवी मोहीम माझ्या सर्व चाहत्यांना नक्की पसंत पडेल, याची मला खात्री आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link