Next
‘सणासुदीत पारंपरिक कपडे आवडतात’
प्रेस रिलीज
Wednesday, October 31, 2018 | 03:47 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘धनत्रयोदशीपासून ते भाऊबिजेपर्यंत दिवाळीचा संपूर्ण आठवडा कुटुंबीय व मित्रमंडळींबरोबर साजरा करण्याच्या कितीतरी सुंदर आठवणी मी जपून ठेवल्या आहेत आणि उत्सवाच्या या संपूर्ण आठवड्यामध्ये पारंपरिक कपडे घालून सजणे मला खूप आवडते,’ असे भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.

‘मान्यवर’च्या खास दिवाळीसाठी आखलेल्या मोहिमेचे औचित्य साधून सणासुदीच्या दिवसांत आपला आवडता लुक कोणता याचे गुपित उघड त्याने उघड केले.

दिवाळी आणि सणांच्या दिवसांबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम याबद्दल बोलताना कोहली म्हणाला, ‘पारंपरिक कपड्यांनी या दिवसांना तो खास फेस्टिव्हलवाला फील येतो. या मोहिमेसाठी शूटिंग करताना रॉयल ब्लू कुर्ता आणि सोनेरी नक्षी असलेले जॅकेट हा लुक मला व्यक्तिश: खूप आवडला. मला माझ्या ‘छोटी दिवाली’चा लुकसुद्धा आवडला, ज्यात मी एक थोडे वेगळ्याच ढंगाचे जॅकेट घातले आहे.’

विराटने सोशल मीडियावर या मोहिमेची घोषणा केली व लोकांना दिवाळीच्या पाचही खास दिवसांसाठी भारतीय पारंपरिक कपडे घालण्याचे आवाहन केले आहे. ज्यात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशा ‘इंडिया एथ्निक विक’दरम्यान येणाऱ्या दिवसांचाही समावेश आहे.

‘इंडिया एथ्निक विक’बद्दल अधिक माहिती देताना कोहली म्हणाला, ‘जेव्हा ‘मान्यवर’ने मला इंडियन एथ्निक विकची संकल्पना सांगितली आणि यानिमित्ताने दिवाळीचा संपूर्ण आठवडा पारंपरिक पेहराव करण्याचे आवाहन मी लोकांना करावे असे सांगितले, तेव्हा मला हा विचार खूप आवडला. मी मनाने या संकल्पनेशी लगेचच जोडला गेलो. मला वाटते की, थोडा बदल म्हणून दिवाळीचा संपूर्ण आठवडा पारंपरिक कपडे घालून हा सण साजरा करण्याच्या या संकल्पनेचे तरुणाईमध्ये चांगले पडसाद उमटतील इंडिया एथ्निक विकला उदंड यश मिळेल.’

दिवाळी हा काही एकाच दिवसात संपून जाणारा सण नसून त्याची तयारीही काही दिवस आधीपासून सुरू होते. दिवाळीचे हेच वैशिष्ट्य ‘इंडिया एथ्निक विक’ या संकल्पनेमागचा विचार आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधीपासूनच म्हणजे धनत्रयोदशीपासून उत्सवाची धामधूम सुरू होते, जी दोन दिवसांनंतर येणाऱ्या भाऊबिजेपर्यंत सुरू राहते. प्रत्येक दिवसासाठी नेमलेले खास रितीरिवाज, परंपरा व प्रत्येक दिवसाची मौजही वेगळी असते आणि अशा दिवसांत पारंपरिक पेहराव केल्याने सणाचा फीलमध्ये भर पडते. या  मोहिमेसाठी चित्रित करण्यात आलेल्या फिल्ममध्ये विराटने नेमकेपणाने हा संदेश दिला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link