Next
पंकजा मुंडे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
प्रेस रिलीज
Wednesday, June 14, 2017 | 12:29 PM
15 0 0
Share this article:

शिवारातील शेतकऱ्यांना योजनांची माहिती देताना पंकजा मुंडे

औरंगाबाद : राज्याच्या महिला व बालकल्याण तथा ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजनेअंतर्गत औरंगाबादमध्ये शिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहीती दिली. 

भारतीय जनता पक्षाच्या शिवार संवाद या अभियानांतर्गत पंकजा मुंडे यांनी बाळापूर, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी जाऊन तेथील शिवारातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या चांगल्या निर्णयांची माहिती त्यांनी या वेळी शेतकऱ्यांना दिली.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून त्यांच्या भल्यासाठी दोन्ही सरकार काम करत आहेत. जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे, या योजनेमुळे राज्य दुष्काळमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे,’ अशी माहिती या वेळी पंकजा मुंडे यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search