Next
२०२०मध्ये नोकऱ्यांच्या ५८ हजार नवीन संधी खुल्या होणार
टीमलीज एम्प्लॉयमेंट आउटलुक अहवालाचा निष्कर्ष
प्रेस रिलीज
Thursday, June 20, 2019 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : सध्याच्या तिमाहीत उत्पादन, अभियांत्रिकी व पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात २०२० या आर्थिक वर्षाच्या  पहिल्या तिमाहीत नोकऱ्यांच्या ५८ हजार २०० नवीन संधी खुल्या होणार असल्याचा निष्कर्ष टीमलीज सर्व्हिसेसच्या अहवालात काढला आहे. ‘टीमलीज’ने एप्रिल-सप्टेंबर २०१९-२० या ‘एम्प्लॉयमेंट आउटलुक रिपोर्ट’ या अर्धवार्षिकाचे नुकतेच प्रकाशन केले. या अहवालात हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. एप्रिल-सप्टेंबर २०१९-२० दरम्यान एकूण रोजगार संधींमध्ये २ टक्के वाढ दिसून येईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

या अहवालानुसार, नोकऱ्यांच्या सर्वाधिक म्हणजे तब्बल नऊ हजार १५० नवीन संधी पुण्यात निर्माण होतील. या बाबतीत मुंबई दुसऱ्या स्थानावर असून, आठ ९४० नवीन नोकऱ्या मुंबईत उपलब्ध होतील. याच कालावधीत बेंगळूरूमध्ये आठ हजार १५ नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील. अहवालासाठी केल्या गेलेल्या अभ्यासानुसार, या क्षेत्रामध्ये गुंतवणूक व उत्पादनात वाढ झाल्यामुळे नोकऱ्यांच्या नवीन संधींमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असलेली दिसून येत आहे. 

या विषयी बोलताना टीमलीज सर्व्हिसेसचे इंडस्ट्रियल, मॅन्युफॅक्चरिंग अँड इंजिनीअरिंग व्हर्टिकल प्रमुख सुदीप सेन म्हणाले, ‘२०१८-१९ दुसऱ्या तिमाहीत उत्पादन, अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा क्षेत्राने ६.४२ कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. २०२५पर्यंत इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक २६ लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहोचेल. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येईल.  उत्पादनात आधुनिकीकरण व आयआयओटी आणले गेल्याने हे क्षेत्र २०२२ शाळांपर्यंत देशाच्या दरडोई उत्पन्नात जवळपास २५ टक्के योगदान देईल व नवीन नोकऱ्या निर्माण होण्याचे प्रमाणही वाढेल. एप्रिल-सप्टेंबर २०१९-२० या कालावधीत उत्पादन अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा उद्योगक्षेत्रांमध्ये ८.०२ टक्के वाढ दिसून येईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search