Next
लघु आणि मध्यम व्यावसायिकांसाठी ‘शॉपमॅटिक वर्ल्ड’
प्रेस रिलीज
Thursday, November 22, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : लघु आणि मध्यम व्यावसायिकांना (एसएमबी) योग्य व्हिजिबिलिटी मिळण्यासाठी ‘शॉपमॅटिक’ या आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स मंचाने ‘शॉपमॅटिक वर्ल्ड’ची घोषणा  केली आहे. ‘शॉपमॅटिक वर्ल्ड’ हा क्युरेटेड मंच ऑनलाइन उद्योजकांच्या वास्तविक गोष्टी, त्यांच्या ठळक कल्पकतेला अनुसरून उभारण्यात आला आहे.

छोटे व्यवसायिक आपल्या ग्राहकांशी कसा संपर्क ठेवतात, त्याची पद्धत बदलण्यासाठी ‘शॉपमॅटिक वर्ल्ड’ ऑनलाइन शॉपर्सना विविध व्यापारी दुकानांतून अनोखी उत्पादने आणि सेवा शोधण्यासाठी आमंत्रित करणार आहे. ‘शॉपमॅटिक’ने दिलेले उपाय आणि मदत यामुळे ५० हजारांपेक्षा जास्त हौशी, कारागीर, गृहिणी, लघु आणि मध्यम व्यवसाय व इतरांना ऑनलाइन उद्योजक बनण्याचा मार्ग सापडला आहे. आता ‘शॉपमॅटिक वर्ल्ड’ दाखल झाल्यामुळे ऑनलाइन उद्योजक यांच्याकडे आता आपली बाजू मांडण्यासाठी आणि ऑनलाइन शॉपर्सशी संपर्कात राहण्यासाठी एक क्युरेटेड मंच आहे. या मार्फत ब्रॅंड्सना डिजिटल विश्वात आपली विक्री, उपस्थिती आणि प्रभाव वाढवण्यासाठी आणखी संधी दिली जाणार आहे.

‘शॉपमॅटिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग अवुला म्हणाले, ‘शॉपमॅटिक वर्ल्डची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, कारण व्यापाऱ्यांना ऑनलाइन शोधण्यास मदत करून लक्षणीय मूल्य प्रस्तुत करण्याचे आमचे ध्येय आहे. ब्रँड्सना सूज्ञ ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना मदतीची गरज असते. ‘शॉपमॅटिक वर्ल्ड’ उद्योजकाची प्रतिभा आणि दृढता यांच्या गोष्टी, तसेच एका कुशल व्यवसायिकातून किंवा हौशी व्यवसायिकातून एक यशस्वी उद्योजक बनण्यातील त्यांच्या निर्धाराच्या गोष्टी सांगते. या क्युरेटेड मंचाच्या माध्यमातून आम्ही लहान व्यवसायांना ते त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी शोधले जाण्यासाठी मदत करू इच्छितो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search