Next
‘पीजीडीएम’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
प्रेस रिलीज
Thursday, November 29, 2018 | 05:08 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील आघाडीचे बी-स्कूल असलेल्या नवी दिल्ली येथील ‘आयएमआय’ने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट (पीजीडीएम) अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख तीन डिसेंबर २०१८ आहे.

‘पीजीडीएम’मध्ये प्रवेश मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी उमेदवारांकडे भारतातील किंवा परदेशातील (युजीसी/ असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हार्सिटीजद्वारा मान्यताप्राप्त) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही अभ्यासक्रमातील किमान ५० टक्के एकूण गुण किंवा समकक्ष गुणांसह स्नातक समकक्ष पदवी असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याने मिळवलेल्या स्नातक किंवा समकक्ष पदवीमध्ये कमीत कमी तीन वर्षांचे शिक्षण असणे आवश्यक असून ते १०+२ प्रणालीतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घेतलेले किंवा त्यास समकक्ष असणे गरजेचे आहे. आपल्या स्नातक पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले किंवा त्यास समकक्ष वर्गात असलेले विद्यार्थीदेखील येथे प्रवेश घेऊन शकतात; मात्र ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत त्यांनी किमान योग्यतेचे निकष पूर्ण करत असल्याचे पुरावे रुजू केले पाहिजेत.

‘आयएमआय’चे प्रमुख-प्रवेश शैलेंद्र निगम म्हणाले, ‘बौद्धिक भांडवल आणि वैविध्य ही वैशिष्ट्ये असलेले आयएमआय सर्वांगीण विकासासाठी एक पोषक वातावरण प्रदान करते. संपूर्ण प्रोफाइल मूल्यांकनावर त्यांचा फोकस असतो. हुशारी ही उद्योगांच्या बदलत्या गरजांशी सुसंबद्ध असल्याची दक्षता येथे घेतली जाते. भरती करणारे लोक उत्पादन, टेक्नॉलॉजी, कन्सल्टिंग, बीएफएसआय अशा विविध क्षेत्रांतून येतात, तर सहभागी हेल्थकेअर आणि ईकॉमर्ससारख्या विकसनशील क्षेत्रातीलदेखील असतात. मॅनेजमेंट शिक्षणाशी संबंधित सर्व गोष्टींसाठी हे एक अपूर्व असे केंद्र बनले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link