Next
‘रत्नदुर्ग’तर्फे निवासी साहसी गिर्यारोहण प्रशिक्षण शिबिर
BOI
Monday, April 22, 2019 | 12:12 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ‘रत्नागिरीतील रत्नदुर्ग माउंटेनीअर्सतर्फे तीन ते पाच मे २०१९ या कालावधीत आठ ते १६ वयोगटातील सुमारे ४० मुला-मुलींसाठी निरुळ येथे निवासी साहसी गिर्यारोहण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती अध्यक्ष शेखर मुकादम व उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू यांनी दिली.

हे या संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, त्यानिमित्त वर्षभरात २५ विविध साहसी क्रीडा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘रत्नदुर्ग’ने गेली २५ वर्षे साहसी शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून मुलांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न नेहमीच करण्यात आला आहे. सुट्टीतला वेळ केवळ मोबाइल, कॉम्प्युटरसमोर फुकट न घालवता मुलांना या शिबिरातून वेगळा आनंद मिळाला आहे. 

या शिबिरात बेसिक रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, केव्हिंग, रिव्हर क्रॉसिंग, झिपलाइन, जंगल ट्रेकिंग, लॅडर क्लाइंबिंग, बर्ड वॉचिंग रोप वॉकिंग, कॅम्प फायर, टेंट पिचिंग, रायफल शूटिंग, टीम बिल्डिंग गेम्स, ड्राइंग अँड क्राफ्ट आणि फनी गेम्स असे अनेक साहसी क्रीडा प्रकार मुलांना शिकवण्यात येणार आहेत. शिबिराचे ठिकाण सुरक्षित, गर्द हिरवळ आणि ऐन उन्हाळ्यात सुद्धा थंडगार, तंबूत राहण्याची मज्जा, प्रथमोपचार सुविधा आणि शेतातील ताजी रासायनिक खतविरहीत भाजीपाल्याचे शुद्ध शाकाहारी जेवण ही शिबिराची वैशिष्ट्ये आहेत. प्रवेशाची अंतिम तारीख दोन मे आहे.

‘रत्नदुर्ग’ ही कोकणातील पहिली गिर्यारोहणातील रजिस्टर्ड संस्था असून, आतापर्यंत ४३पेक्षा जास्त साहसी शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. यात गिर्यारोहणातील पहिला राज्य शासनाचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित मुख्य प्रशिक्षक गिर्यारोहक प्रदीप केळकर, यांच्यासमवेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनीअरिंगमधून प्रमाणित आणि प्रशिक्षित अनुभवी १४ जणांची टीम आहे.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी पत्ता : प्रकाश वस्तू भांडार, विठ्ठल मंदिरजवळ, रत्नागिरी.
संपर्क : गणेश चौघुले- ९०८२१ ०७८०१
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 79 Days ago
Training in First Aid --is essential . Medical help can be far away
0
0
मकरंद About 91 Days ago
रत्नदुर्ग माउंटनियर्सला रौप्य महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि शिबिरासाठीही खूप खूप शुभेच्छा
0
0

Select Language
Share Link
 
Search