Next
रत्नागिरीत सामवेद स्वाहाकाराचे आयोजन
BOI
Friday, January 25, 2019 | 05:44 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी :
जनकल्याणाच्या हेतूने रत्नागिरीतील ब्राह्मण पुरोहित संघातर्फे नुकतेच सामवेद संहिता स्वाहाकार, तसेच ऋग्वेद आणि कृष्ण यजुर्वेद पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील वेदपाठशाळेत १७ ते २२ जानेवारी २०१९ या कालावधीत हा सोहळा पार पडला. 



समाजातील अरिष्टांचा नाश व्हावा आणि जनतेचे कल्याण व्हावे, असा उदात्त हेतू ठेवून ब्राह्मण पुरोहित संघातर्फे गेली १८ वर्षे अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. दर वर्षी वेगळ्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी यजुर्वेद स्वाहाकार, तर त्याआधी ऋग्वेद स्वाहाकार करण्यात आला होता. यंदाच्या सोहळ्यात सामवेद संहिता स्वाहाकार, तसेच ऋग्वेद आणि कृष्ण यजुर्वेद पारायणाचा समावेश होता. सर्वसाधारणपणे ऋग्वेदाचा स्वाहाकार केला जातो; मात्र अन्य वेदांचे स्वाहाकार होणे तसे दुर्मीळ झाले आहे. त्यामुळेच ती परंपरा टिकून राहण्याच्या दृष्टीने अशा धार्मिक विधींचे आयोजन ब्राह्मण पुरोहित संघाकडून करण्यात येते.

नागपूरचे वेदमूर्ती कृष्णा पळसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंदाच्या सोहळ्याचे पौरोहित्य केले. कोल्हापूरचे वेदमूर्ती संदीप काजरेकर गुरुजी (सामवेदी) हेही दोन दिवस कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांसह रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ८० पुरोहितांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन उत्तम पद्धतीने पार पाडला. ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष रामदास फडके यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. 

२१ जानेवारीला वेदमूर्ती ह. भ. प. पुंडलिकबुवा हळबे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या कालावधीत दररोज आरत्या, तसेच शनिवारी आणि रविवारी पारंपरिक भोवत्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. २२ जानेवारीला पूर्णाहुतीनंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. बहुसंख्य रत्नागिरीकरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. 

(निरपेक्ष भावनेने वेदांचे अध्यापन करून अनेक विद्यार्थी घडविणारे रत्नागिरी जिल्ह्यातील कुर्धे येथील दिवंगत वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके यांची जन्मशताब्दी अलीकडेच साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने त्यांच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक विधींसंदर्भात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)









 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search