Next
‘भाजप’च्या मुलाखतींना इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, November 13, 2018 | 11:11 AM
15 0 0
Share this article:अहमदनगर : महापालिका निवडणुकीत इतर पक्ष उमेदवारांसाठी चाचपडत असताना भारतीय जतन पक्षाकडून (भाजप) मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. १२ नोव्हेंबर २०१८ रोजी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ‘भाजप’ने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. या वेळी इच्छुकांनी ढोल-ताशांच्या गजरात मुलाखतींना हजेरी लावली.

‘भाजप’कडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी अधिक असल्याने दिवसभरात केवळ तीस ते चाळीस टक्केच मुलाखती पूर्ण होऊ शकल्या आहेत. उर्वरित मुलाखती १३ नोव्हेंबर रोजी घेतल्या जाणार असून, लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर केली जाणार आहे. नऊ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेसाठी मतदान होणार असून, १० डिसेंबरला निकाल लागणार आहेत. १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर सर्वच पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे. अहमदनगर महापालिकेची ही चौथी सार्वत्रिक निवडणूक असून, स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या ‘भाजप’नेही उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह खासदार दिलीप गांधी, आमदार सुजितसिंग ठाकूर, प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, ‘भाजप’ कार्यकारणी सदस्य अभय आगरकर आणि जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत दिवसभर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या.नियोजनानुसार फक्त सोमवारचा एकच दिवस मुलाखतीसाठी राखीव ठेवण्यात आला होता; मात्र ‘भाजप’कडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता मंगळवारीदेखील मुलाखतींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आमदार ठाकूर यांनी दिली.

‘पहिल्या दिवशी एक ते १२ प्रभागांतील ११७ इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, उर्वरित प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी होणार आहेत. प्रभाग क्रमांक पाचमधून सर्वाधिक १९ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या, तर प्रभाग क्रमांक तीनमध्येही इच्छुकांची संख्या ११ इतकी होती. ‘भाजप’च्या उमेदवारीसाठी झालेली गर्दी म्हणजे गेल्या चार वर्षांच्या काळात ‘भाजप’च्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासाच्या कारभाराला मिळालेली पावती आहे,’ अशी प्रतिक्रिया आमदार ठाकूर यांनी दिली.  ‘आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेली ही महापालिका अधिक सक्रिय करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील मतदारही या वेळी ‘भाजप’च्या पारड्यात नक्की आपले मते टाकतील,’ असा विश्वास खासदार गांधी यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search