Next
फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’च्या वतीने वारीनिमित्त विविध उपक्रम
प्रेस रिलीज
Friday, July 06, 2018 | 06:12 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आषाढी यात्रा पंढरपूरच्या वारीनिमित्त फिनोलेक्स पाईप्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरात विविध ठिकाणी वारी मार्गावर हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

फिनोलेक्स पाईप्सच्या वतीने राजगिरा लाडू, चिक्की व फराळाच्या चिवड्याचे वाटप, तर मुकुल माधव फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर घेण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरु तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ महाराज, श्री गजानन महाराज या पालखी मार्गावर ही सेवा पुरविली जाणार आहे. पुण्यात दिघी, निगडी, उरळीकांचन, सासवड, इंदापूर, बारामती, नीरा आणि इतर अशा एकूण २३ ठिकाणी जवळपास एक लाखापेक्षा अधिक लाडूचे, चिक्कीचे पाकीट वाटण्यात येणार आहे;तसेच अकरा ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले असून, त्याद्वारे उपचार व तपासणी केली जाणार आहे. फिनोलेक्स पाईप्समधील कर्मचारी, पदाधिकारी व डॉक्टरांची टीम वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी उत्सुक आहे, असे या दोन्ही संस्थांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search