Next
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा
BOI
Friday, March 23, 2018 | 02:44 PM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोपिंपरी-चिंचवड : शहरात प्रथमच राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका, इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी महापौर संजोग भिकू वाघेरे महापौर चषक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा २०१७-१८ असे या स्पर्धेचे नाव आहे. जाधववाडी चिखली येथील रामायण मैदानावर २३ आणि २४ मार्च रोजी या स्पर्धा होत आहेत. 

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते २४ तारखेला स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, अॅड. गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या  स्पर्धेमध्ये देशाच्या २९ राज्यांमधील एकूण ५३५ खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी नऊ राज्यांमधून ४५ महिलाही सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा १५ प्रकारांमध्ये होणार आहे. स्पर्धेमध्ये विविध प्रकारांतील विजेत्या खेळाडूंना एकूण १६ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने २८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मंगोलिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड या स्पर्धेमधून करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link