Next
सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जी. के. ऐनापुरे
BOI
Saturday, February 09, 2019 | 03:53 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र यांच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथाकार जी. के. ऐनापुरे यांची निवड करण्यात आली असून, संमेलनाचे उद्‌घाटन प्रसिद्ध कादंबरीकार किरण नगरकर यांच्या हस्ते होणार आहे. हे संमेलन २० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे,’ अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली. 

जी. के. ऐनापुरे
‘ या वेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार’ डॉ. गेल अॅमवेट यांना डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऐनापुरे यांचा १४ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम होईल. संमेलनाच्या उद्घाटनास ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उप-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, संमेलनाचे माजी अध्यक्ष यशवंत मनोहर, सुधाकर गायकवाड, डॉ. विजय खरे, डॉ. अनिल सपकाळ उपस्थित राहणार आहेत,’ असेही वाडेकर यांनी सांगितले.


किरण नगरकर
‘साहित्य-संस्कृतीतून व्यापक परिवर्तनवादी दृष्टी लाभावी; तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या तत्त्वांबरोबर लोकशाही समाजवादी मूल्ये रुजावीत, या हेतूने २०१० पासून सम्यक साहित्य संमेलन भरवले जात आहे. हे संमेलन वाचक, साहित्यिक आणि विचारवंतांना जोडणारे विचारपीठ आहे. पाच दिवसांच्या या संमेलनात संविधान दिंडी, विविध विषयांवर परिसंवाद, शाहिरी जलसे, संगीत, नाटके व कविसंमेलन असे कार्यक्रम होणार आहेत,’ असे वाडेकर यांनी स्पष्ट केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search