Next
स्त्री संतांच्या कार्याचे भरतनाट्यम नृत्य नाटिकेतून दर्शन
प्रेस रिलीज
Wednesday, January 16, 2019 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत भारतीय कला केंद्रातर्फे ‘समर्पण’ या भरतनाट्यम नृत्य नाटिकेचे   आयोजन शुक्रवारी १८ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले आहे. सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल,’ अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.

संत कान्होपात्रा, संत मुक्ताई, संत जनाबाई या तीन स्त्री संतांच्या कार्याची रूपे मांडणारा हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना अश्विनी एकबोटे यांची असून, लेखन अनघा काकडे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन अनघा हरकरे यांचे, तर संगीत स्मिता महाजन यांचे आहे. अनुश्री केतकर, श्रिया एकबोटे, प्रज्ञा कदम, बिलंदी कुलकर्णी, भार्गवी अत्रे, श्रद्धा पवळे आदी यामध्ये सहभागी होणार आहेत.

भारतीय विद्या भवन-इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६७ वा कार्यक्रम असून, हा कार्यक्रम विनामूल्य असून, सर्वांसाठी खुला आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शुक्रवार, १८ जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : भारतीय विद्या भवनचे सरदार नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search