Next
‘शिवप्रतिष्ठान’ची आगळी-वेगळी शिवजयंती
प्रेस रिलीज
Friday, March 09 | 05:17 PM
15 0 0
Share this storyपुणे :
‘शिवप्रतिष्ठान, गणेश नगरतर्फे चार मार्च २०१८ रोजी ‘एक वही एक पेन शिवरायांच्या चरणी’ हा सामाजिक उपक्रम शिवजयंतीनिमित्त राबविण्यात आला,’ अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे किशोर खामकर, अजिंक्य चव्हाण, शुभम खामकर यांनी दिली.

या उपक्रमांतर्गत वही ८३० नग, पेन ४५० नग, पेन्सिल ३०० नग, खोडरबर ३०० आणि रंगपेटीचे  ५७ नग जमा झाले आहे. सिद्धेश फाले, साहिल सातपुते, भूषण परबते, ओंकार खामकर, सौरभ विधाते, अर्जुन देमाणे, सोहम आवळे, हर्षल जाधव, प्रतीक ढावरे, स्वप्नील खामकर, स्वप्नील आंबुरे यांनी या उपक्रमात सहकार्य केले आहे.

या उपक्रमाची माहिती देताना किशोर खामकर म्हणाले, ‘ शिवप्रतिष्ठानच्या सात चाळ पूरग्रस्त वसाहत एरंडवणे येथील युवकांतर्फे गेली सहा वर्षे घराच्या अंगणात शिवजयंती साजरी करण्यात येते. अनेक शिवभक्त या दिवशी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अथवा हार अर्पण करतात. यावर्षी आम्ही ‘एक वही एक पेन शिवरायांच्या चरणी’ ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेतंर्गत शिवरायांच्या चरणी हार, पुष्प न वाहता फक्त एक वही, एक पेन अर्पण करा, असे आवाहन करण्यात आले. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे.’

‘या उपक्रमामध्ये वही-पेन, पेन्सिल, खोडरबर आदी शालेय वस्तू स्वीकारण्यात आल्या. जमा झालेल्या वस्तू गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच गरजू अनाथ मुलांना वाटण्यात येणार आहेत. रयतेला साक्षर बनविण्याचे शिवछत्रपतींचे स्वप्न साकार करण्याचा आमच्या प्रतिष्ठानचा हा एक छोटासा प्रयत्न आहे’, असे आयोजक अजिंक्य चव्हाण आणि शुभम खामकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Haralkar jay About 282 Days ago
जय शिवराय असे उपक्रम राबविले तर कोणीही निरक्षर राहू नये हे शिवरायांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल या कार्यास मानाचा मुजरा
0
0

Select Language
Share Link