Next
‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’
प्रेस रिलीज
Friday, June 08, 2018 | 12:29 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला पूणे येथे होत असून, त्यानिमित्त राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभाही याचदिवशी पार पडणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल सांगता सभा पुणे येथे सायंकाळी चार वाजता शिंदे हायस्कूलच्या मैदानावर पर्वती येथे होणार आहे. या सांगता सभेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हेही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मुंबईबाहेर जाण्यास कोर्टाने बंदी घातली होती; परंतु कोर्टात याबाबत मागणी केल्यानंतर कोर्टाने त्यांना परवानगी दिली असल्याने ते सभेला उपस्थित राहणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय संमेलन नऊ आणि १० जूनला होणार होते; मात्र राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे आत्ता हे राष्ट्रीय संमेलन २३ आणि २४ जून रोजी पुणे येथे होणार आहे. सध्या पक्षाच्या आढावा बैठका सुरू असून, लवकरच पक्षाची कार्यकारिणीही जाहीर होणार आहे,’ असे मलिक म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search