Next
हेमलकसामध्ये एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण
प्रेस रिलीज
Monday, March 18, 2019 | 05:45 PM
15 0 0
Share this article:



गडचिरोली : डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पामध्ये नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वसतिगृह अधीक्षिका नेहा ठोंबरे यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई’ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले. या वेळी आमटे कुटुंबीय, लोकबिरादरी आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.



भारतातील स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवासाचे विविध पैलू या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून ठोंबरे यांनी उपस्थितांसमोर मांडले. आतापर्यंत नागपूर व इतर जिल्ह्यांत विविध समाजसेवी संघटनांच्या वतीने आयोजित सात कार्यक्रमांमध्ये या प्रयोगाचे सादरीकरण झाले आहे. हेमलकसा येथे आयोजित या प्रयोगाच्या सादरीकरणावेळी डॉ. आमटे दांपत्याने ठोंबरे यांचा सत्कार केला व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search