Next
‘एलआयसी’चे प्रीमियम भरण्याची सुविधा आता ‘पेटीएम’वर
प्रेस रिलीज
Thursday, November 22, 2018 | 02:57 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या ‘पेटीएम’च्या ‘वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’ने भारतीय जीवनविमा निगम (एलआयसी) या देशातील सर्वांत मोठ्या जीवनविमा कंपनीशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या मंचावरून ग्राहकांना आता काही सेकंदात ‘एलआयसी’चा हप्ता भरणे शक्य होणार आहे.

‘पेटीएम’वर ‘एलआयसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, रिलायन्स लाइफ, मॅक्स लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, टाटा एआयए, एसबीआय लाइफ, आदित्य बिर्ला सन लाइफ, कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स, श्री राम लाइफ आणि स्टार हेल्थ यांच्यासह ३० हून अधिक विमा कंपन्यांचे हप्त्ये सहजगत्या ऑनलाइन भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध आहे. ‘पेटीएम’ हा ऑनलाइन विमा हप्त्ये भरण्यासाठी पसंतीचा मंच बनत आहे आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत ३०-४० दशलक्ष पॉलिसींचा रनरेट गाठण्याचे या मंचाचे अनुमान आहे.

‘पेटीएम’चे सीओओ किरण वासिरेड्डी म्हणाले, ‘आपल्या देशात विम्याचे हप्त्ये सामान्यपणे ऑफलाइन पद्धतीने भरले जातात. आमच्या ग्राहकांना पेमेंटचा सुलभ अनुभव मिळावा अशी ‘पेटीएम’मध्ये आमची इच्छा आहे. ‘एलआयसी’ आणि इतर आघाडीच्या विमा कंपन्यांशी आम्ही केलेल्या भागीदारीमुळे आमच्या लाखो वापरकर्त्यांना पेटीएम अॅपवरून पसंतीची पेमेंट पद्धत वापरून आपली विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची सुलभ आणि वेगवान पद्धत उपलब्ध होईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search