Next
‘इकोफ्रेंड्स’च्या अध्यक्षपदी सुहास कुलकर्णी
प्रेस रिलीज
Tuesday, July 30, 2019 | 01:45 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ पुणे इकोफ्रेंड्सच्या अध्यक्षपदी सुहास कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. कल्पना भालेराव यांची उपाध्यक्षपदी, अरुण कुलकर्णी यांची सचिवपदी, तर महादप्पा अंदुरे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. 

एमजेएफ लायन सुनील चेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. या वेळी ‘इकोफ्रेंड्स क्लब’चे संस्थापक अध्यक्ष अनिल मंद्रुपकर, रिजनल चेअरपर्सन डॉ. विलास कुलकर्णी, अॅड. बिपीन पाटोळे, शंतनू पेंढारकर, रमेश पसरीजा, योगेश कदम, गणेश अणेराव यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

सुहास कुलकर्णी‘सध्या असलेला पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन क्लबतर्फे जलसंवर्धनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालये, कार्यालये, सोसायट्यांमधून सेमिनार्स, रॅली, व्याख्याने आयोजित करून पाणीबचतीविषयी जागृती केली जाणार आहे. या शिवाय वृक्षारोपण, ऑक्सिजन पार्कची निर्मिती, स्वच्छ स्वारगेट बसस्थानक, स्वच्छ पुणे शहर, पर्यावरण, शिक्षणासाठी ‘कॅच देम यंग’ हा उपक्रम, वेदर मॉनिटरिंग स्टेशन आणि किचन गार्डनिंग असे नावीन्यपूर्ण उपक्रम क्लबतर्फे आगामी वर्षात राबविण्यात येतील,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search