Next
उद्योग करावा ऐसा
BOI
Saturday, November 04 | 02:15 PM
15 0 0
Share this story

स्वतःचा उद्योग-व्यवसाय करण्यासाठी अनेक गुणांची गरज असते. त्याबद्दल आपण नेहमी ऐकत येतो; मात्र स्वतंत्रपणे काम करण्यासाठी आणखीही एक गोष्टीची गरज असते, ती म्हणजे प्रेरणा. ही प्रेरणा देण्याचे काम डॉ. सुरेश हावरे यांचे हे पुस्तक करते. शून्यापासून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक उद्योजकांची कहाणी त्यांच्या या पुस्तकात वाचायला मिळते.

या पुस्तकात २३ उद्योजकांच्या मुलाखतींचा समावेश आहे. मधुकर तळवलकर, अशोक खाडे, वीणा पाटील, विनय मराठे, संजीव पेंढरकर, दीपा मंत्री, राम भोगले ही त्यातील वानगीदाखल काही नावे. या सगळ्यांना उद्योग उभारताना कोणत्या अडचणी आल्या, आव्हानांशी सामना कसा केला, माणसे कशी जोडली या मुद्द्यांबरोबरच त्यांच्या संघर्षाची नि परिश्रमाची गाथा वाचायला मिळते.    

प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : २३९
किंमत : ३०० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा.)

 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link