Next
वासिंदमध्ये ‘एक वही एक पेन’ अभियान
मिलिंद जाधव
Thursday, April 18, 2019 | 11:16 AM
15 0 0
Share this article:



ठाणे : वासिंद येथील सिद्धार्थ फाउंडेशन या संस्थेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १४ एप्रिल २०१९ या कालावधीत ‘एक वही एक पेन’ अभियान राबविण्यात आले.

या अभियानात सर्व समाजातील नागरिकांनी सहभागी होत गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी, पाट्या, खडू पेट्या, कंपास आदी शैक्षणिक साहित्य देऊन, तसेच रोख रक्कम स्वरूपात मदत केली. ‘संस्थेकडे जमलेले हे साहित्य जून २०१९मध्ये सर्व समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आम्ही शाळा-शाळांवर जाऊन वाटप करणार आहोत,’ असे सिद्धार्थ फाउंडेशनचे सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी सांगितले.

अभियान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंत धनगर, सरचिटणीस अशोक गायकवाड, खजिनदार  रत्नदीप शिवगण, माजी अध्यक्ष जगदीश गायकवाड, माजी अध्यक्ष भास्कर गायकवाड, कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष मच्छिंद्र साळवे, उपाध्यक्ष एम. जे. वाढविंदे, सहचिटणीस संतोष गायकवाड, कैलास खैरनार, हिशोब तपासणी भागवत चन्ने, संचालक होमराज शेंडे, सुरेंद्र शेवाळे, प्रकाश गायकवाड, औदुंबर गंगावणे, अशोक शंकर गायकवाड, शिवराम चन्ने, गुरूनाथ गायकवाड, बळीराम गायकवाड, जितेंद्र खरे, जगदीश सोष्टे, सदस्य मिलिंद गायकवाड, संजीव जाधव, सिद्धार्थ साळवे, संदीप गायकवाड, संदीप निकम आदींनी मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search