Next
‘एमसीई’ सोसायटीतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा
प्रेस रिलीज
Monday, January 28, 2019 | 06:02 PM
15 0 0
Share this story



पुणे : आझम कँपस येथील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आझम कॅंपसच्या व्ही. एम. गनी स्पोर्ट्स पॅव्हेलिअनच्या क्रीडागंणावर सकाळी निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी भूषविले. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांतून भारताच्या सर्व राज्यांतील संस्कृतीचे सादरीकरण केले. आझम कॅंपस परिवारातील सर्व संस्था, ट्रस्टचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक यांसह २५ हजार विद्यार्थी उपस्थित होते.



एनसीसी पथक, अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूल, आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज, स्कॉलर बॅच, पै पब्लिक स्कूल, आझम उर्दू स्कूल, पै परवाझ, गोल्डन ज्युबिली, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा, तैय्यबिय्या अनाथालय, स्कूल ऑफ आर्ट आणि आझम स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली.

स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अॅकॅडमीच्या ११व्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश कळसकर यांनी पोर्ट्रेटचे प्रात्यक्षिक दाखवले. हेमा जैन, भरत लोंढे यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. इनामदार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रोशन आरा, प्रा. मजिद सय्यद व प्रा. दिलशाद सय्यद यांनी केले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link