Next
‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची हजेरी
प्रेस रिलीज
Monday, November 12, 2018 | 05:26 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. याचा प्रत्यय देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून दिसणाऱ्या कलाकारांची प्रत्यक्ष भेट होणे हा आनंद त्यांना सुखावणारा होता. त्यासाठी शहापूर ते मढ असा प्रवास करत ही मंडळी सेटवर पोहोचली आणि ‘छोटी मालकीण’च्या कलाकारांसोबत एकत्र जेवणाचा आनंद लुटला.

शहापूरजवळील सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थिनींनी ‘छोटी मालकीण’च्या सेटवर उपस्थिती लावली. या विद्यार्थिनी ‘छोटी मालकीण’ ही मालिका न चुकता पाहतात. मालिकेवरील याच प्रेमापोटी त्यांनी कलाकारांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. ‘छोटी मालकीण’च्या सेटवर या लाडक्या चाहत्यांचे थाटात स्वागत करण्यात आले. शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत कलाकारांनीही त्यांच्याशी मनसोक्त संवाद साधला.‘छोटी मालकीण’ मालिकेतील श्रीधर म्हणजेच अक्षर कोठारीला या खास चाहत्यांबद्दल समजले तेव्हा तो अतिशय आनंदीत झाला. ‘एरव्ही चाहत्यांना भेटण्याची संधी आम्हा कलाकार मंडळींना खूप कमी वेळा मिळते त्यामुळे माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. ही आठवण मी कॅमेऱ्यात कैद करून ठेवली आहे,’ असे अक्षरने सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link