Next
रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटीच्या अध्यक्षपदी विनोद पाटील
BOI
Monday, July 01, 2019 | 06:05 PM
15 0 0
Share this article:

रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटीचे अध्यक्ष म्हणून विनोद पाटील यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली. या वेळी डॉ. महेश कोटबागी, डॉ. राजेंद्र विखे पाटील, रूपींदर बेदी, विनोद पाटील, केनेडी सॅम्युअल आणि मनोजित चौधरी आदी.

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटीच्या अध्यक्षपदी विनोद पाटील यांची निवड झाली आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पाटील यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी रोटरीचे पुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे, माजी पुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. महेश कोटबागी, क्लबच्या माजी अध्यक्षा रूपींदर बेदी, माजी सचिव केनेडी सॅम्युअल, नवनिर्वाचित सचिव मनोजित चौधरी आदी उपस्थित होते.

विनोद पाटील यांच्याबरोबर मनोजित चौधरी (सचिव), अजित घाटे (खजिनदार), केनेडी सॅम्युअल (सर्व्हिस प्रोजेक्ट संचालक) हे कार्यकारीणीअंतर्गत काम पाहतील.  

‘यंदाचे वर्ष रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटीचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने या वर्षात अनेक महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत,’ अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली. या कामांमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, गोदान, रूग्णालयांचे अद्ययावतीकरण, मेडिकल कॅम्प यांचा समावेश असणार आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search