Next
‘आरबीएस अर्थ हीरोज’चा उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
प्रेस रिलीज
Tuesday, October 30, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली : आरबीएस इंडिया या रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या (आरबीएस) नाविन्य व ऑपरेशन्स केंद्राने २०१८च्या आरबीएस ‘अर्थ हीरोज’ पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. इकोसंस्थेचे रक्षण करण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन काम करणाऱ्या आठ विजेत्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

‘आरबीएस’ने २००७मध्ये आरबीएस फाउंडेशन इंडियाची स्थापना केली आणि तेव्हापासून अकराशेहून अधिक गावांत समुदाय सक्षम करत आहे. रोजगारात सुधारणा करत आहे असून, संवर्धनाला चालना देत आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, जम्मू व काश्मीर आणि उत्तर प्रदेश येथे सुरू असलेले फाउंडेशनचे २२ प्रकल्प १२ लाख चार हजार ४७५ हून अधिक कुटुंबांना लाभ देत आहे.

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा ‘आरबीएस अर्थ हीरोज’ पुरस्कारांनी गौरव करताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘पृथ्वीवरील मौल्यवान संसाधनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या उल्लेखनीय संस्था व व्यक्ती यांची दखल घेणाऱ्या व त्यांचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारांची सुरुवात केल्याबद्दल मी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचे (आरबीएस) अभिनंदन करतो.’आरबीएस फाउंडेशन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सर्व्हिसेस कंट्री हेड पंकज फातरफोड म्हणाले, ‘हवामानातील बदल व नैसर्गिक संसाधनांची घट यांचे परिणाम जाणवत आहेत. हा गंभीर प्रश्न सोडवण्याची जबाबदारी केवळ एकट्या कायद्यांची नाही, तर आपली सकारात्मक कृतीही गरजेची आहे. ‘आरबीएस अर्थ हीरोज’ पुरस्कारांमुळे ‘आरबीएस’ला संवर्धन व शाश्वतता या क्षेत्रांत उल्लेखनीय व अथक कार्य करणाऱ्या एंटिटी व व्यक्ती यांचा सन्मान करण्याची संधी मिळत असल्याने या पुरस्कारांची वाटचाल प्रेरणादायी आहे. दर वर्षी या पुरस्कारांचे आयोजन करणे, हे आमचे भाग्य आहे.’

‘आरबीएस’चे भारतासाठीचे सस्टेनेबिलिटी प्रमुख व आरबीएस फाउंडेशन इंडियाचे संचालक ए. सुनील कुमार म्हणाले, ‘आमच्या पुरस्कारांसाठी प्राप्त झालेली नामांकने आपणा सर्वांसाठी आदर्श व विनयशीलतेची आहेत. नैसर्गिक वारसा जतन करण्याची जबाबदारी उचलेल्या आणि काही वेळी वैयक्तिक मालमत्ता व कल्याण धोक्यात घालणाऱ्या व त्यांचा त्याग करणाऱ्या अनेक व्यक्ती भारतातील लोकसेवा खऱ्या अर्थाने करत आहेत.’

आरबीएस ‘अर्थ हीरोज’ २०१८चे पुरस्कार विजेते असे : डॉ. ब्रिज गोपाल, विशेष कृती दल (वन्यजीव, मध्य प्रदेश वन विभाग), पीरा राम बिश्नोई (आरबीएस ‘सेव्ह द स्पेसीज’ पुरस्कार) देवेंदर सिंह चौहान, रीटा बॅनर्जी (आरबीएस इन्स्पायर पुरस्कार), अभिलाष खांडेकर, ललित कुमार बोरा (आरबीएस ग्रीन वॉरिअर पुरस्कार), दिवंगत एस. मणिकंदन.   पर्यावरणाचा वाढता असमतोल समुदाय, वन्यजीव व त्यांचा अधिवास यांच्यावर परिणाम करत असून, धोक्यात आलेली जंगले, पाणथळ व अन्य नैसर्गिक इकोसंस्था यांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व कृती करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी सन २०११मध्ये आरबीएस अर्थ हीरो पुरस्कार सुरू करण्यात आले. देशभरातून आलेल्या ६०हून अधिक नामांकनातून, नऊ सदस्यांच्या स्वतंत्र परीक्षक मंडळाद्वारे या पुरस्कारांच्या विजेत्यांची निवड करण्यात आली. परीक्षकांमध्ये संवर्धन व फिल्ड बायॉलॉजी क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींचा व अधिकाऱ्यांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search