Next
‘जीविधा’च्या चर्चासत्राला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Thursday, July 26 | 04:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील जीविधा संस्थेतर्फे २५ जुलैला सायंकाळी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे ‘अपरिचित लडाख’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘लडाख हे उंचावरील शीत वाळवंट म्हणून प्रेक्षणीय आहेच; पण तेथील अपरिचित जैववैविध्य अनुभवण्यासारखे आहे,’ असा सूर उमटला.

‘जीविधा’चे संचालक राजीव पंडित, निसर्ग पर्यटन अभ्यासक रूपेश बलसारा या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

चर्चासत्रात माहिती देताना राजीव पंडितपंडित म्हणाले, ‘थंड वाळवंट, साहसाला निमंत्रण देणारे, खडखडीत रस्ते आणि बुद्ध धर्माच्या ‘मॉनेस्ट्री’ यामुळे परदेशी, देशी पर्यटक ‘लडाख’कडे आकर्षित होतात; परंतु यापलीकडे जाऊन सिंधू नदी, पेंगॉगसारखी सरोवरे, जैववैविध्य प्रेक्षणीय आहेत.’ सिंधू-झंस्कार नदीचा संगम, पोर्णिमेला चंद्र आणि सूर्यप्रकाश एकदम पाहण्याची संधी अशा अनोख्या गोष्टींचा परिचय या वेळी पंडित यांनी करून दिला.

रूपेश बलसाराबलसारा यांनी ‘सिंधू नदी, क्रौंच पक्षांच्या वसाहती, खार दुंगला, खनिजांनुसार रंग असलेले डोंगर, चंद्रभूमी सदृश्य टेकड्या, स्वच्छ निसर्गामुळे आकाशदर्शनातून दिसणार्‍या दूधगंगा या गोष्टी आयुष्यातून एकदा पाहिल्या पाहिजेत,’ असे सांगून ‘लडाखला हवा विरळ असल्याने आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने पचनशक्ती मंदावते, त्यामूळे कमी खावे, साधे अन्न खावे, जाण्यापूर्वी चालणे, श्‍वासाचे व्यायाम करावेत’, अशी माहिती दिली.

पंडित व बलसारा यांनी लेह, नुब्रा व्हॅली, पेंगॉग लेक, कारगिल आदी भागांची माहिती दिली. श्योक, लोमा, उंच प्रदेशात आकाश निरीक्षणाची दुर्बिण बसवलेले हनले, न्योमा, आर्य लोकांचे दहाहनू यांसारख्या ‘अपरिचित लडाख’ची माहिती दिली. या चर्चासत्राला निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link