Next
आयर्लंडमध्ये उच्च शिक्षणाची संधी
पुण्यात २४ फेब्रुवारी रोजी आयर्लंड एज्युकेशन फेअर
BOI
Wednesday, February 06, 2019 | 03:58 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : उच्च शिक्षणासाठी उत्कृष्ट ठिकाणांच्या शोधात असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयर्लंड उत्सुक असून, आयर्लंड सरकारच्या वतीने तिथल्या विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती देण्याकरता भारतातील पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी २०१९ ते तीन मार्चपर्यंत चालणाऱ्या या  फेअरमध्ये २० विद्यापीठे आणि अन्य शैक्षणिक संस्थांची माहिती मिळणार आहे. 

या एज्युकेशन फेअरची सुरुवात दिल्ली येथे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार आहे. त्यांनतर पुण्यात २४ फेब्रुवारी रोजी, मुंबईत २७ फेब्रुवारी रोजी, बेंगळुरूमध्ये दोन मार्च रोजी आणि चेन्नईमध्ये तीन मार्च रोजी हे एज्युकेशन फेअर होणार आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना विद्यापीठांच्या प्रतिनिधींना भेटून, त्यांच्याशी प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, प्रवेश संख्या, सोयी सुविधा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सवलती इत्यादीबाबत  थेट संवाद साधता येणार आहे. या फेअरमध्ये प्रत्येक शहरातील एका विद्यार्थ्याला तीन हजार युरोची शिष्यवृत्ती मिळवण्याची संधीही मिळणार आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार बॅरी ओ’ड्रीस्कोल म्हणाले, ‘ या फेअरमध्ये विद्यार्थ्यांना सर्व माहिती मोफत मिळणार असून, ते आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमाची सर्व माहिती घेऊन त्यासाठी थेट प्रवेश अर्ज करू शकतील. विविध अभ्यासक्रम, शिष्यवृत्त्या यांची सविस्तर माहिती त्यांना अधिकृत व्यक्तींकडून मिळेल. आयर्लंडमध्ये मिळणाऱ्या दर्जेदार शिक्षणामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी नेहमीच त्याला पसंती दिली आहे. शिक्षणानंतर नोकरी, व्यवसायाचीही उत्तम संधी मिळत असल्याने येथे शिक्षण घेण्याला अधिक पसंती दिली जाते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link