Next
महावीर फूड बँकेतर्फे दहा हजार किलो धान्यवाटप
BOI
Tuesday, August 27, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this article:

महावीर फूड बँक व जय आनंद ग्रुप यांच्या वतीने आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते विविध संस्थांना दहा हजार किलो धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी विजयकुमार मर्लेचा, प्रवीण चोरबेले, विजय भंडारी, पोपटलाल ओस्तवाल, राजेश साकला आदी उपस्थित होते.

पुणे : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘एक मूठ धान्य’ या संकल्पनेतून चातुर्मासानिमित्त महावीर फूड बँक व जय आनंद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील संस्थांना दहा हजार किलो धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. 


शिवाचार्य समवसरण वर्धमान सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला ध्यानाचार्य भगवंत प. पू. डॉ. शिवमुनीजी, युवाचार्य प. पू. महेंद्र ऋषीजी यांच्यासह प. पू. राष्ट्रसंत आचार्यसम्राट श्री आनंद ऋषीजी उपस्थित होते. पुणे शहर भाजपच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. या वेळी पुण्यप्रदान रथावर पुणेकरांनी धान्य, तसेच रोख देणगी प्रदान केली. प्रमिलाबाई नौपतलाल साकला, बी. जे. भंडारी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विजय भंडारी, स्व. शांतीलाल छाजेड (चोपडा) यांच्या स्मरणार्थ प्रमोद छाजेड या परिवाराने दिलेल्या देणगीतून हा उपक्रम घेण्यात आला. जवाहरलाल बोथरा, पुष्पा कटारिया, हेमा गदीया, रंजना साकला, संगीता छाजेड यांचे यात योगदान मिळाले. 

महावीर फूड बँकेने पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे पाच लाख अकरा हजार किलो धान्य मोफत वाटले असल्याचे या बॅंकेचे पुणे शहर अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी सांगितले. 

या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, नगरसेवक प्रवीण चोरबेले, विजय भंडारी, पोपटलाल ओस्तवाल, राजेश साकला, कमलाबाई भंडारी, जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष अशोक लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पाच हजार श्रावक आणि श्राविकांनी डॉ. शिवमुनी यांच्या ‘शक्ती का स्रोत’ या विषयावरील प्रवचनाचा लाभ घेतला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search